पिंपरी- इंद्रायणी युवा प्रतिष्ठान व नगरसेवक तुषारभाऊ सहाणे ह्यांच्या तर्फे यंदाचा दही हंडी उत्सव २०२६ मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
इंद्रायणी नगर, भोसरी, सेक्टर नं.२ येथे झालेल्या दहायहॅन्डी उत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण होते आप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेत्री शिवानी नाईक आणि देवयानी फेम भाग्यश्री मोटे.
‘भगवान श्रीकृष्णांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचा जागर व्हावा. दहीहंडीच्या उत्साहातून युवकांमध्ये एकजूट, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी. हा उत्सव आनंद, उत्साह आणि आपुलकीने साजरा होत असताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची नवी दिशा मिळो’ अशी भावाने नगरसेवक तुषार सहाणे यांनी व्यक्त केली.
या उत्सवाची झलक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/Dc753qQMC-l/?stkn=M2dkMzd1eTJyaTR1
