पिंपरी- मोशी प्राधिकरण सारख्या उच्चभ्रू वसाहती मध्ये राहूनही वीज जाण्याचं प्रणाम खूप मोठया प्रमाणात होते. नगरसेवक तुषार सहाणे यांच्या पाठपुराव्यामुळे डीपीडीसी (DPDC) योजनेअंतर्गत या भागात लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे.
मोशी प्राधिकरण भागात गेल्या काही महिन्यांपासून पासून विजेचा लपंडाव सुरु होता. वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी तसेच विद्यार्थी, गृहिणी, विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय या सर्वाना त्रास सोसावा लागत आहे.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक तुषार सहाणे यांनी मोशी प्राधिकरण परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व सक्षम करण्यासाठी डीपीडीसी (DPDC) योजनेअंतर्गत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव महावितरणच्या संबंधित विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. सदर प्रस्तावास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. याबाबतची माहिती अधीक्षक अभियंता गायकवाड यांनी दिली आहे.
प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची पुढील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक तुषार सहाणे यांनी दिली आहे.सदर काम मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
