ब्रेकिंग न्यूज

Vedh News

डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक, पुण्यातील घटना

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुबाडण्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील फरार आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. रोहन रामेश्वर जाधव (वय २६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी हर्षद धनतोले, समर्थ देशमुख, अमर अत्तरगी आणि…

Read More

राम गोपाल वर्मा काढणार एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘दया नायक’ यांच्या जीवनावर सिनेमा

सत्या, कंपनी, डी, सरकार यासारखे अनेक गाजलेले सिनेमे देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे राम गोपाल वर्मा. गेल्या काही वर्षांपासून राम गोपाल वर्मा यांचे नाव बॉलिवूडमधून पुसले गेल्यासारखे झाले आहे. कारण त्यांचे थरारक सिनेमे पाहण्याची संधी बॉलिवुडप्रेमीना खूप वर्षांपासून मिळालेली नाही. पण आता प्रतीक्षा संपली आहे. लवकरच राम गोपाल वर्मा एका नाव सिनेमा घेऊन येणार आहेत. कोणता…

Read More

डीएसके प्रकरणात ३५ हजार ठेवीदारांना न्याय मिळण्याची शक्यता

पुणे- ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने एमपीआयडी विशेष न्यायालयाला दिले आहेत. त्यामुळे ३५ हजार ठेवीदारांना त्यांनी गुंतवलेले पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर १५…

Read More

आपले नाव मतदार यादीमधून वगळले जाऊ शकते, आजच एसआयआर गणना अर्ज भरा

मुंबई- राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अद्याप सुमारे १ कोटी ८० लाख मतदार गणना या प्रक्रियेबाहेर राहिल्याची माहिती समोर आली आहे. या उर्वरित मतदारांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंतचीच अंतिम मुदत शिल्लक आहे. विहित मुदतीत त्यांनी अर्ज न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची…

Read More

हातात बिअरच्या बाटल्या घेत पुण्यात परप्रांतीय तरुणांचा हैदोस, चार जणांना अटक 

पुणे – दारूच्या नशेत भरधाव कारमधून हातामध्ये बिअरच्या बाटल्या घेऊन मध्यरात्री स्टंटबाजी करणाऱ्या चार परप्रांतीय तरुणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.  पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दररोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. परप्रांतीय तरुणांनी रात्रीच्या वेळी पुण्यातील रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हातात बिअरच्या बाटल्या घेऊन भरधाव…

Read More

चंदुकाका सराफ यांची सोन्याची बिस्किटे घेऊन पळालेल्या सराईत चोरट्याला चंद्रपूर येथून अटक

पुणे – चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानातून सोने खरेदी करण्याचा बहाणा करुन १४ लाख ७८ हजार रुपयांची सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेल्या सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी चंद्रपूर येथून जेरबंद केले आहे. सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३८, रा. म्हसोबाची वाडी, ता. इंद्रापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. चंदननगर येथील चंदुकाका सराफ या दुकानात ३ व…

Read More

गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची रोकड लुटून चोरटे पसार 

पिंपरी – थेरगाव परिसरात पहाटेच्या वेळी एक थरारक घटना घडली आहे. रुग्णालयाबाहेर उभ्या केलेल्या कारच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याला रोखणे व्यापाऱ्याला भलतंच महागात पडलं. या व्यापाऱ्याच्या गळ्याला कोयता लावून रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नीरज हकीम सोळंके (वय २१) आणि सूरज हकीम सोळंके (वय १९) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आनंदराव…

Read More

२२ लाखांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क निरीक्षकाला पुण्यात रंगेहाथ अटक

पुणे- मद्यविक्री परवाना नूतनीकरणासाठी २२ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ निरीक्षकाला ACB च्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. जितेंद्र हरिश्चंद्र पाटील असे लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील एका मद्यविक्री दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण रखडले होते. यासाठी दुकानदाराने उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज केला होता. मात्र फाईल पुढे नेण्यासाठी संबंधित…

Read More

नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर गडकरी यांचे संबंधीत विभागाला तात्काळ निर्देश पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत मार्गी लागणार असून त्यानंतर लागलीच हे काम सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने लक्ष घालून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी…

Read More

‘होय मी अंधभक्त !’ अनफॉलो करायचं असेल तर करा ; इशा कोप्पीकरने सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेवर आक्षेप घेतल्यामुळे ट्रोल झालेल्या अभिनेत्री ईशा कोप्पीकरने स्पष्ट शब्दांत “हो, मी देशासाठी अंधभक्त आहे, कोणाला अनफॉलो करायचं असेल तर करा,” असा सडेतोड पवित्रा घेतला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी वापरण्यात आलेल्या अपमानास्पद शब्दांवर ईशा कोप्पीकरने तीव्र संताप व्यक्त…

Read More