ब्रेकिंग न्यूज

वर्ल्ड वॉटर फोरम मध्ये पीसीसीओईच्या विजय सावंतने केले प्रतिनिधित्व

पिंपरी, पुणे (वेध न्यूज )  बाली, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या “१० व्या वर्ल्ड वॉटर फोरम” मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी विजय रणजीत सावंत यास मिळाली. वर्ल्ड वॉटर फोरम मागील ३० वर्षांपासून पाणी समस्यांवर संशोधन करून उपाय सुचविणाऱ्या संशोधकांना जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणारी नामांकित संस्था आहे….

Read More

विधी संघर्षग्रस्त ५० बालकांनी जाणून घेतला सिंहगडाचा इतिहास, घेतली व्यसनमुक्तीची शपथ

पुणे – गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी एक संवेदनशील आणि मानवतावादी उपक्रम राबवला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने 50 विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी विशेष दुर्गभ्रमण आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे नसून, बालकांचे…

Read More

फूड डिलिव्हरी बॉयवर कोयता आणि पट्ट्याने प्राणघातक हल्ला, महिला व्यवस्थापिकेला अटक

पिंपरी- क्षुल्लक कारणावरून डिलिव्हरी बॉयवर कोयता आणि पट्ट्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फूड डिलिव्हरी कंपनीच्या महिला व्यवस्थापक आणि तिच्या पतीसहित ४ साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काळेवाडी येथील पाचपीर चौकात घडली. सुंदरम लालचंद यादव (वय २५, रा. राहाटणी) असे हल्ला झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. व्यवस्थापिका आशु, तिचा पती…

Read More

चाकणच्या वाहतूक आणि औद्योगिक समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती

चाकण- चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी आणि प्रलंबित समस्यांमुळे येथील उद्योजकांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महत्वाचे पॉल उचलले आहे. राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापन केली आहे. येत्या १० महिन्यात या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात…

Read More

श्री भगवान गडावर दसरा मेळावा साठी पिंपरी मधून जाणार हजारो नागरिक – सदाशिव खाडे 

पिंपरी- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.  शुक्रवारी चिंचवड येथे श्री भगवान गडावर जाणाऱ्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे,…

Read More

भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन

मोशी- भूगोल फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक स्वास्थ्य व महिला सुरक्षाविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .  या कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनाली गोडबोले पाटील, ज्ञानप्रबोधिनी संवादिनी गटाच्या सदस्या जयश्री तुंगार, सविता पाटील,माया अमृतकर, संतनगर मधील ज्येष्ठ महिला स्मिता देशपांडे, विमल शेळके, अनुराधा शिंदे, पुष्पा थोरात, चव्हाण काकू,…

Read More

विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी येणार, कार्यक्रमाची तारीख ठरली

बारामती- “विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या वास्तूमध्ये गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवणारे प्रेरणास्थान उभारण्यात येणार आहे. या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे….

Read More

लौट्टेच्या आईस्क्रीम उत्पादन सुविधेचे पुण्यात उद्घाटन

पुणे : लौट्टे ने आपल्या जागतिक विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत पुण्यात आपल्या सर्वात मोठ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेची घोषणा केली. सुविधेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, लौट्टे समुहाचे अध्यक्ष डाँग बीन शीन, रिपब्लिक ऑफ…

Read More

व्हॉटसअ‍ॅपला स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून १७ वर्षाच्या युवकाचा खून, दोन अल्पवयीन ताब्यात

पुणे- आम्हाला मारहाण करून जेलमध्ये गेलेल्यांच्या स्टेटस व्हॉटसअ‍ॅपला का ठेवतोस या कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या युवकाच्या डोक्यात हातोडीने वार करुन त्याचा निर्घृण खून केला. कोथरुड येथील एआरएआय येथील टेकडीवरील जंगलात मंगळवारी रात्री ही घटना घडली. नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरुड) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. कोथरुड पोलिसांनी दोघा…

Read More

मोशी प्राधिकरणात पर्यावरणपुरक दीपोत्सव साजरा

मोशी (वेध न्यूज )  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित मोशी प्राधिकरण मधील संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व परिसरातील पर्यावरण प्रेमी ,संस्था तसेच इंद्रायणीनगर , संतनगर परिसरातील नागरीक यांच्या सहकार्याने एक दीप पर्यावरणासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. मोशी प्राधिकरणातील एम आय डी सी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे पर्यावरणाचा संदेश देत  हजारो…

Read More