ब्रेकिंग न्यूज

मोशी दुर्घटनेतील मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नीची आत्महत्या, परिसरात हळहळ 

Share

मोशी- पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो जवळील इमारत दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांची पत्नी सोनाली नागेश गायकवाड यांनी पतीच्या वियोगाने आत्महत्या करत जीवन संपवले. या हृदयद्रावक घटनेने त्यांच्या दोन लहान मुली पोरक्या झाल्या असून गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली गायकवाड यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गेल्या महिन्यात मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा प्रचंड मोठा ढिगारा जवळ असलेल्या इमारतीवर कोसळला होता. या दुर्घटनेमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. यापैकीच एक होते मयत नागेश गायकवाड. आता पतीला जाऊन एक महीना होतो ना होतो तोच, मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आपलं आयुष्य संपवलं आहे. काल रात्री उशीरा त्यांनी गळफास लावून जीवन संपवलं. त्यांच्या मागे दोन मुली असून आधी वडील गेले, त्यापाठोपाठ आता आईही जग सोडून गेल्या दोन्ही मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.