ब्रेकिंग न्यूज

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांनी केले जेरबंद, जिवंत काडतूसासह 51 हजारांचा मुद्देमाल जप्त

Share

पुणे- पुण्यात गावठी शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे. बाणेर-वाघोली रस्त्यावरील मित्रानगर परिसरात ही कारवाई केली.

विशाल प्रद्याद कलबंडे, (वय 26 वर्षे, रा. ज्ञानेश्वरी हाइट्स, भिलारेवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी यांच्या पथकाला 29 जुलै रोजी बाणेर-वाघोली रस्त्यावरील गंगार्दनजवळ एक इसम संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये आरोपीकडून 1 गावठी बनावटीचे पिस्तूल किंमत ₹50,000 आणि 1 जिवंत काडतूस किंमत ₹1,000 असा एकूण ₹51,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसींग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश संख्याळे आणि अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली.