ब्रेकिंग न्यूज

मंत्री,आमदारांची मर्जी सांभाळण्यासाठी आयुक्तांनी निविदा प्रक्रियेच्या अटी शर्ती बदलल्या

महाविकास आघाडीचा गंभीर आरोप पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये निविदा प्रक्रिया राबवताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करून ठराविक ठेकेदारांना फायदा मिळवून दिला जात आहे. या ठेकेदार कंपन्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित असून, यांच्या दबावाखालीच आयुक्त शेखर सिंह या निविदा प्रक्रियेला मंजुरी देत आहेत. रुग्णालय, शाळा तसेच प्रशासकीय इमारतींसाठी लागणारे सुरक्षा रक्षक आणि ट्राफिक वॉर्डन यासाठी…

Read More

राजगुरूनगर तालुक्यात १८ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

राजगुरूनगर – राजगुरूनगर जवळील थिगळस्थळ येथे एका १८ वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  हर्ष हिरामण मांजरे (वय १८, रा. पांडुरंगनगर, थिगळस्थळ, राजगुरूनगर, मूळ रा. मांजरेवाडी पिंपळ, ता. खेड) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष रात्री सव्वानऊच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ झाला तरी…

Read More

भोसरी गावठाणात भाजप उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार

पिंपरी- विकासात्मक हिंदुत्वाचा विचार घेऊन पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विकास प्रकल्प राबवले. मागील सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील भाजपा युवा नेते रवी लांडगे यांनी बिनविरोध निवडून येऊन भाजपचे खाते उघडले आहे. भोसरी गावठाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र, कबड्डी केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळेची नवीन इमारत, भोसरी गावठाण परिसरातील सर्व…

Read More

महापालिकेच्या प्रत्येक विभागातील आदेश, परिपत्रकाची स्वतंत्र ‘स्थायी आदेश फाईल’ करण्याचे निर्देश 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांकडून वेळोवेळी जारी होणारे कार्यालयीन आदेश, परिपत्रके, सूचना, शासन निर्णय तसेच महत्त्वपूर्ण प्रशासकीय आदेश यांची व्यवस्थित नोंद व जतन करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र ‘स्थायी आदेश फाईल’ अथवा ‘कार्यालयीन आदेश फाईल’ तयार करून ती अद्ययावत ठेवावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. विभागप्रमुखांच्या…

Read More

पुण्यात गांजा विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध मकोका, कोंढवा पोलिसांची कारवाई 

पुणे – पुण्यात गांजा विक्री आणि दहशत माजविणाऱ्या टोळीच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण बसेल असे बोलले जात आहे.  या संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख रियाज अय्याज शेख (वय ३०) याच्यासह यास्मीन करीम शेख, आमिर समीर शेख, साबीया रियाज शेख आणि शमा उर्फ जोहराबी मुस्ताक शेख या ५…

Read More

आळंदीमध्ये बालविवाहाचा धक्कादायक प्रकार, नातेवाईकांसह मंगल कार्यालय संचालकांना अटक

पुणे- नवरीचे वय १८ आणि नवरदेवाचे कायदेशीर वय २० असताना त्यांचा विवाह लावून दिल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मंगल कार्यालयाच्या संचालकांसह नातेवाइकांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवाच्या आळंदीमध्ये अलंकापुरी मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. विवाहाच्या वेळी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होते, परंतु मुलाचे (नवरदेवाचे) वय २० वर्षे…

Read More

राहुल गांधी इफेक्ट ? प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठक, मुख्यमंत्र्यांसहित संपूर्ण भाजप पुण्यात

पुणे- पुण्यात येत्या सोमवारी ( दि. ३१) बी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपची इतकी ताकद असतानाही पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता…

Read More

गायिका केतकी माटेगावकरकडून आर्थिक मदतीची विनंती ; कुणासाठी मागत आहे आर्थिक मदत ?

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर, जिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पैशांची मदत मागितली आहे. गार्गी नावाच्या एका चिमुकलीला झालेल्या दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी केतकीने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे. केतकीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिने सांगितलं की, “तिला एक दुर्मिळ असा आजार आहे, एसएमए टाइप 1 म्हणजेच स्पाइनल मस्कुलर ॲट्रॉफी. यामध्ये आता तिला तिची मानही…

Read More

पहाटेच्या गाढ झोपेतच मृत्यूने गाठले, घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई – घाटकोपर पूर्व भागातील अशोकनगर परिसरातील गौसिया चाळीवर मोठी दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज पहाटे ३ ते ४ च्या सुमारास घडली.  लोक गाढ झोपेत असतानाच डोंगराचा मोठा कडा थेट गौसिया चाळीतील २ ते ३ घरांवर कोसळला. काही कळण्याच्या आतच डोंगराच्या ढिगाऱ्याखाली…

Read More

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे १० प्रवक्ते मांडणार पक्षाची भूमिका ; ‘या’ चेहऱ्यांना मिळाली संधी 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नव्या १० प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध नेत्यांचा समावेश आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे,…

Read More