मोशी – माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे आहे.आई लेकराला जन्म देते ,वाढवते, त्याच्या ओंजळीत सार विश्व रीतं करते पण लेकरू मोठ झाल की आईलाच विसरतं म्हणून माणसाची विचित्र अवस्था झाली आहे तर पर्यावरणावर हि वेळ आली आहे.असे मत रंगनाथ महाराज नाईकडे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाविषयी विविध अध्यात्माचे दाखले देत मार्गदर्शन केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संतनगर मोशी येथील भूगोल फाऊंडेशनकडून वृक्षारोपण, वृक्ष नामकरण सोहळा आयोजन करण्यात आले होते .
या उपक्रमात भुगोल फाउंडेशन व जंगल गार्डन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणात माऊली ग्रुप,नाना नानी पार्क मित्रमंडळ,सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, वृक्ष व संवर्धन समिती, ज्येष्ठ नागरिक संघ,वृक्षमित्र संघटना, इंटेलिजन्स स्कूल इंद्रायणी नगर, रोटरी क्लब डायनॅमिक भोसरी, व्यसनमुक्ती केंद्र टीम, ओम शांती ध्यान केंद्र, सहजयोग परिवार, मेडिकव्हर हॉस्पिटल टीम यांच्यासह अनेक संस्था सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवडचे प्रथम नागरिक महापौर रवी लांडगे, राष्ट्रपती सन्मान प्राप्त वृक्षप्रेमी रमेश खरमाळे सर, इंटेलजिन्स सुकलच्या शीबु मॅडम, इंद्रायणी सेवा संघाचे विठ्ठल वीर,दिपक सोनवणे, अण्णा मटाले, रविंद्र आळणे, जंगल गार्डनचे संस्थापक विश्वनाथ टेमगिरे, चंद्रकांत रासकर ,मेजर डावखर,संतोष दौंडकर, गुलचंद लोखंडे, डॉ. मोरे, डाॅ.गाडेकर ,नवनाथ कोलते,अनिल घाडगे,शोभा फटांगडे,ज्योती दरंदले,शैला इचके,मीना अखाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.भुगोल फाउंडेशनचे विठ्ठलनाना वाळुंज यांनी शाळेतील मुलांना वृक्षओळख व वृक्षांविषयी माहिती करुन देण्यात आली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करुन वृक्षाला पाणी घालून व वृक्षऒळख प्रदर्शनाचे उद्घाटन करुन सुरुवात करण्यात आली.प्रथम वृक्षांवर आधारीत स्वागत गीत,वृक्षांवर बारसेचा पाळणा त्यावेळी घुग-या म्हणून चिंचोके वाटण्यात आले त्यानंतर सद्यस्थितीवर आधारीत पर्यावरण प्रबोधन करणारे भारूड सादर करण्यात आले.यामध्ये भूगोल फाउंडेशन व वटेश्वर महिला मंडळ सदस्यांनी सादर केले यामध्ये शोभा फटांगडे,ज्योती दरंदले,आशा वाळुंज,सुनिता बिरादार,रोहिणी वाळुंज,सुरेखा गावडे,संगिता इचके व प्रभाकर बनकर यांनी तबला साथ देत सादर केले.मान्यवरांचा वृक्ष,पर्यावरणाचा संदेश देणारी कापडी पिशवी आणि उपरणे देऊन सन्मान करण्यात आला .यानंतर हास्यकलाकार मारुती करंडे यांनी “श्वास गुदमरतोय ओ माझा” हा वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढत पर्यावरणाचे प्रबोधन करत कार्यक्रम सादर केला.

वृक्षमित्र रमेश खरमाळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवन, शुद्ध श्वास, संतुलित तापमान आणि सुरक्षित पर्यावरण मिळावे यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल टिकविण्यासाठी वृक्ष अत्यंत आवश्यक आहेत. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून प्राणवायू देतात, तापमान नियंत्रित ठेवतात, भूजल पातळी वाढवतात आणि जैवविविधतेचे संरक्षण करतात. मानवाला जगण्यासाठी अन्न, पाणी आणि ऑक्सिजन आवश्यक असून हे सर्व वृक्षांशी जोडलेले आहे. म्हणून प्रत्येकाने घरात, टेरेसवर, शाळा, महाविद्यालय किंवा उपलब्ध जागेत वृक्ष लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज यांनी येथुन पुढे वृक्षारोपणासाठी भुगोल फाउंडेशनला आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले.नगरसेवक तुषार सहाणे आणि डाॅ सुहास कांबळे यांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या कामाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
भूगोल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलनाना वाळुंज यांनी सर्वांना पर्यावरणाची शपथ दिल्यानंतर पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्या संध्या वाळुंज यांनी केले व शेवटी शोभा फटांगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज माकोडे,अजय म्हस्के,निकुंज रेंगे,अनिल घाडगे ,भास्कर दातीर,गणेश बिरादार ,गुलचंद लोखंडे, श्रीकांत मोरे,प्रसाद वाव्हळ असे अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले व अनेक महिला,नागरीक उपस्थित होते.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेला हा वृक्षारोपण आणि वृक्ष नामकरण(बारसे) सोहळा हा पर्यावरण संवर्धन,प्रबोधन जनजागरण लोकसहभाग आणि हरित भविष्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.
