ब्रेकिंग न्यूज

भोसरी मोशी प्राधिकरणात पर्यावरणपुरक दीपोत्सव साजरा

भोसरी -त्रिपुरारी पौर्णिमेनिमित मोशी प्राधिकरण मधील संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व एम आय डीसी भोसरी पोलीस स्टेशन, परिसरातील पर्यावरण प्रेमी यांच्या सहकार्याने एक दीप पर्यावरणासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला . एम आय डीसी भोसरी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे पर्यावरणाचा संदेश देत भुषण खंदारे याने रांगोळ्या काढून तसेच…

Read More

रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्तीची ! मराठी न आल्यास परवाने होणार निलंबित

मुंबई- आज, गुरुवारपासून राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांची मराठी विषयाची परीक्षा होणार आहे. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची सूचना देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार…

Read More

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

पिंपरी (प्रतिनिधी) :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संत तुकाराम नगर येथे सलग दुसऱ्या वर्षी दिंडी काढण्यात आली. दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या…

Read More

भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेची कंटेनरला धडक, आजोबा नातवाचा मृत्यू

पुणे- भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर केडगावच्या हद्दीत रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडला. शेटीबा वडजी मुधोळकर (वय ७०) आणि देवानंद सुरेश मुधोळकर (वय १७ दोघेही राहणार १२ नं पाटी, मांजर, ता. रेणापूर, जि….

Read More

पिंपरीत अल्पवयीन सख्या बहिणींवर ६५ वर्षाच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी- सख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षाच्या नराधमाला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या नराधमाने १० वर्षाच्या मुलीवर चारवेळा तर चार वर्षाच्या तिच्या बहिणीवर एकदा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे. रमजान बन्नूसाब बागवान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोक्सो आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

Read More

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत प्रशांत मोरे, केशर निर्गुण यांना विजेतेपद

पुणे- सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या कै. विनायक निम्हण स्मृती करंडक ५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात प्रशांत मोरे याने तर, महिला गटात केशर निर्गुण यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत दोन…

Read More

माेशीत कचरा टाकणे बंद करा अन्यथा…… सत्ताधारी नगरसेवकांचा प्रशासनाला इशारा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माेशी कचरा डेपाेत मोठी दुर्घटना घडून ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला दोन महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे पुढील ४० दिवसांत दहाही क्षेत्रीय कार्यालयात कचऱ्यासाठी जागा निश्चित न झाल्यास माेशीत कचरा टाकल्यास डेपाेला टाळे ठाेकण्यात येईल, असा इशारा माेशी परिसरातील…

Read More

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मजनू नाटेकर यांचे नगरसेवकपद रद्द

तळेगाव दाभाडे- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक मजनू हनुमंत नाटेकर यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा आदेश दिला. तळेगाव प्रभाग क्र १० अ मधील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मजनू हनुमंत नाटेकर यांनी तर करून प्रकाश सरोदे यांनी अर्ज दाखल केला होता. नाटेकर यांनी अनुसूचित जातीसाठीच्या…

Read More

डॉ . सुलक्षणा शिलवंत समाजाभिमुख सुशिक्षित नेतृत्व – भाऊसाहेब डोळस

पिंपरी (वेध न्यूज) पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध, मागास दुर्बल घटकाला समाजाभिमुख सुशिक्षित तसेच दृष्टे नेतृत्व हवे आहे असे मत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांनी व्यक्त केले. बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला….

Read More

खासगी वाहनावर ‘पोलीस’ बोर्ड लावणे पडले महागात ! २३ वाहनचालकांकडून ११ हजार ५०० रुपये वसूल दंड वसूल

पुणे- खासगी वाहनावर विनापरवाना पोलीस किंवा पोलिसांचा लोगो लावून फिरणे वाहनचालकांना महागात पडले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी २३ वाहनचालकांवर कारवाई करून ११ हजार ५०० रुपये वसूल दंड वसूल केला आहे. खासगी वाहनावर विनापरवाना पोलीस किंवा पोलिसांचा लोगो लावणे कायद्याने गुन्हा असूनही अनेकजण आपल्या वाहनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स, बोर्ड लावून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतात.तसेच…

Read More