ब्रेकिंग न्यूज

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मजनू नाटेकर यांचे नगरसेवकपद रद्द

Share

तळेगाव दाभाडे- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक मजनू हनुमंत नाटेकर यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा आदेश दिला.

तळेगाव प्रभाग क्र १० अ मधील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मजनू हनुमंत नाटेकर यांनी तर करून प्रकाश सरोदे यांनी अर्ज दाखल केला होता. नाटेकर यांनी अनुसूचित जातीसाठीच्या राखीव गटातून ही निवडणूक लढवली होती. बेकायदेशीर कागदपत्रे सादर करून महार जातीचा दाखल मिळविल्याचे आरोप करण्यात आला होता. या संदर्भात जिल्हा जातपडताळणी समितीकडे दाद मागण्यात आली होती. जात पडताळणी समितीने केलेल्या पडताळणीमध्ये सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

दि. ६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम १६(१-क)(ब) नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यत्व रद्द केले असून ती जागा रिक्त घोषित केली आहे. या आदेशाची प्रत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राज्य निवडणूक आयोग आणि नगरविकास विभागाला पाठवण्यात आली आहे.