ब्रेकिंग न्यूज

‘हिंमत असेल तर…. !’ भाजप शहराध्यक्षांनी पोलिसांना काय इशारा दिला ?

Share

पुणे – शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यातच पोलिसांनी येत्या दहीहंडीला डीजे लावण्यास बंदी केली आहे. त्याचा विरोध करताना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला. ‘हिंमत असेल; तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा; पुण्याच्या गणेशोत्सवावरच अटी आणि निर्बंध का?’, असा सवाल केला आहे.

पोलिसांच्या या निर्णयामुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी गणेश बीडकर आणि भाजपचे शहराध्यक्ष घाटे यांची भेट घेतली. ‘पोलिस स्पीकर्सवर बंदी घालणार असतील; तर विसर्जनाच्या दिवशी गणपती मांडवातून बाहेर काढणार नाही,’ असा इशारा या वेळी कार्यकर्त्यांनी दिला. ‘पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाबाबत पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय अथवा निर्बंध लादल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. मंडळांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढावा,’ अशी मागणी घाटे यांनी केली.

भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला. ‘पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाबाबत पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय अथवा निर्बंध लादल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. मंडळांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढावा,’ अशी मागणी घाटे यांनी केली. दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे भाजपचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.