ब्रेकिंग न्यूज

राज्यात सुटे खाद्यतेल विकण्यास मनाई, तुकाराम मुंढे यांचा आदेश

Share

मुंबई- महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातर्फे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात २० ऑगस्ट २०२६ पासून सुट्टे खाद्यतेल विकण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, खाद्यतेलाची विक्री सुट्ट्या स्वरूपात करता येत नाही हा नियम अगोदरपासून आहे. मात्र या नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. नोंदणी न केलेल्या खाद्य तेल कंपन्या आम्हाला आढळून आल्या आहेत. खाद्य तेलात भेसळ केली जात असून मोहरी तेल अनधिकृत मिश्रण केले जातंय, ज्याची परवानगी नाही. किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा सुट्टे तेल विक्री करू नये, असे आवाहन तुकाराम मुंढे यांच्याकडून करण्यात आले. खाद्यतेलाच्या वापरांचे उल्लंघन केल्यास आता 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यासोबतच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर 10 लाखापर्यंत दंड लागू शकतो असे त्यांनी सांगितले.

या आदेशातील प्रमुख मुद्दे आणि नियम

सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी

बाजारात मिळणारे सुट्टे तेल खरेदी आणि विक्री करण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.किरकोळ विक्रेत्यांनी यापुढे उत्पादकांकडून किंवा घाऊक बाजारातून सुट्टे तेल विकत घेऊ नये.नागरिकांना देखील सुट्टे खाद्यतेल न खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पॅकेजिंग आणि लेबलिंगचे नियम

खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद (Packed & Sealed) पाकिटांमध्ये किंवा डब्यांमध्येच करणे बंधनकारक आहे.तेलाच्या पाकिटावर उत्पादनाचा खरा स्रोत, ब्रँडचे नाव, बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि मुदत संपण्याची तारीख स्पष्टपणे लिहिलेली असणे अनिवार्य आहे. गंजलेले, जुने किंवा एकदा वापरलेले टिनचे डबे (रिसायकल केलेले डबे) पुन्हा तेल भरण्यासाठी वापरण्यास मनाई आहे.

भेसळीला आळामोहरीच्या तेलात इतर कोणत्याही तेलाचे अनधिकृत मिश्रण करून ते विकता येणार नाही. ते १०० टक्के शुद्धच विकावे लागेल. मुदत संपलेले तेल रिपॅक करून विकणाऱ्या साखळीवर कडक नजर ठेवली जाईल.