जनता माझ्या पाठीशी,शंकर जगताप आणि राहुल कलाटे हे माझ्यासाठी आव्हान नाही – नाना काटे
पिंपरी : चिंचवड विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन नाना काटे यांच्या रॅलीची सुरवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे, उषा माई काळे, हरिभाऊ तिकोणे, खंडुशेठ कोकणे, शिरीष साठे,…
