ब्रेकिंग न्यूज

‘एफडीए’ची पुण्यात सर्वात मोठी कारवाई, बर्गर किंग आणि झेप्टोचा अन्न परवाना रद्द

Share

पुणे -अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी अस्वच्छता, भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाईची विशेष मोहीम राबवत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या तावडीतून राज्यातील पंचतारांकित हॉटेल्स, नामांकित रेस्टॉरंट्स, पब्स तसेच फूड डिलिव्हरी ॲप्सच्या स्टोअर्स कुणीही सुटले नाहीत. आता पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने पुण्याच्या कॅम्प परिसरातील बर्गर किंगवर एफडीने धाड टाकून अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर परवाना थेट रद्द केला आहे. तसेच लोहगाव येथील झेप्टोच्या गोडाऊनवरही अशाच प्रकारची कारवाई करून अन्न परवाना थेट रद्द केला आहे.

एफडीएच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीत येथे अन्नाच्या दर्जात मोठी तडजोड होत असल्याचे समोर आले. तसेच, रेस्टॉरंटमधील अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर त्रुटी पाहता एफडीए त्वरित कोणतीही संधी न देता या आउटलेटचा परवाना थेट रद्द केला आहे. दररोज हजारो नागरिक जिथे चवीने बर्गर खातात, तिथेच अन्नसुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे उघडकीस आल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.