ब्रेकिंग न्यूज

तो अपघात नव्हे तर खून ; विवाहितेची प्रियकराने ताम्हिणी घाटात नेऊन केली हत्या

पुणे- ताम्हिणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत मंगळवारी दुपारी एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह झुडपात आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसून येत होते. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रायगड स्थानिक गुन्हे शाखा आणि माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीना जेरबंद केले.  ही…

Read More

आयुक्तांनी स्पष्टच सांगितले, विसर्जन मिरवणुकीत ‘या’ डीजे वर बंदी

पुणे – पुढील काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात डीजे बंदीवर मोठी घोषणा केल्यामुळे पोलीस आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात वाद पेटला आहे. आयुक्त  अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन डीजेबद्दल भूमिका स्पष्ट केली. पुण्याचे पोलीस ‘प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सगळे…

Read More

श्रावणात दारू पिऊन मांसाहार मागणाऱ्या मुलाचा वडिलांनी केला खून 

पुणे – श्रावणात दारु पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याने वडिलांनी रागाच्या भरात मारहाण करुन मुलाचा खून केला. ही घटना वारजे माळवाडी येथे २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. हा प्रकार आईने लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आल्यामुळे आई वडील दोघांनाही अटक करण्यात आली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०, रा. रामनगर,…

Read More

ऐनवेळी पोलीस आले आणि खंडणीचा डाव उधळला, तरुणींसह तिघांना अटक

शिक्रापूर- इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचे नाटक करून तरुणाला भेटायला बोलावले. त्यानंतर त्याला डांबून त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून एका तरुणीसहित तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शीतल संजय डाके, वैष्णवी आकाश गायकवाड, आकाश चिंतामण गायकवाड आणि शुभम कांडगे अशी…

Read More

दहशत माजवणारा व्हिडिओ शेअर केला, पोलिसांनी हिसका दाखवला

बारामती- एका तरुणाने हातात पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन एक धमकीवजा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सुपा पोलिसांच्या नजरेस हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी या तरुणाला आपला पोलिसी हिसका दाखवला. प्रेम प्रताप जगताप असे व्हिडीओ शेअर केलेल्या तरुणाचे आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा…

Read More

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना येरवडा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट, अग्रवाल कुटुंबाचा आरोप

पुणे- संपूर्ण देशात जगलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना येरवडा कारागृहात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील दोन संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना येरवडा तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप…

Read More

दीपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकर यांच्यावर 500 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा

पुणे- आपली बदनामी केल्याचा आरोप करीत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दीपाली सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. अभिनेत्री आणि शिंदे सेनेच्या नेत्या दीपाली…

Read More

औद्योगिक विस्ताराला चालना देण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात उभी राहणार ७४३ हेक्टरवर महाकाय एमआयडीसी

पुणे- पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला नवीन चालना मिळाली असून शिरूर आणि खेड तालुक्यांच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टर क्षेत्रावर भव्य नवीन एमआयडीसी (MIDC) उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अधिकृतपणे जमीन संपादनाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. पाबळ-धामारी परिसरातील एकूण ७४३ हेक्टर (सुमारे १८३६ एकर) जमिनीवर ही वसाहत उभी…

Read More

रुपाली चाकणकर यांच्या ३५ कोटींच्या हॉटेलचे उदघाटन होताच महिला काँग्रेस नेत्याचा एकच प्रश्न ‘ बाई,…..?’

पुणे- राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कल्याणीनगर मधील पॉश भागात The Nines या नावाने एक बार आणि रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या हॉटेलची किंमत ३५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून काँग्रेसच्या एका महिला नेत्यांने एकच प्रश्न विचारला आहे, ‘बाई एवढी माया आली कुठून?’ दोनच दिवसांपूर्वी या हॉटेलचे उदघाटन करण्यात आले….

Read More

औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द, फेरपरीक्षा घेण्याचा लोकसेवा आयोगाचा निर्णय 

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने काढला आहे. त्यामुळे आता फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. २२ मार्च २६ रोजी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील ६ विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर…

Read More