ब्रेकिंग न्यूज

पुण्यात संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातील वादातून उचलले टोकाचे पाऊल

पुणे – प्रियकरासोबत झालेल्या वादातून २३ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खराडी येथे घडली. याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.  जान्‍हवी पाठक (वय २३) असे या तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार येथील आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडली. याप्रकरणी…

Read More

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, मद्यधुंद चालकाला अटक 

शिरूर – मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पिकअप चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडला. हा अपघात रांजणगाव – सोनेसांगवी रस्त्यावर सोनेसांगवी पठाराजवळ शुक्रवारी (ता. २९) रात्री आठ वाजता घडला. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील पिकअप चालकाला अटक केली. दीपक राजेश थोरात (वय २२, रा. शिंदेवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) असे…

Read More

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेला महामार्ग बंद राहणार 

मुंबई – समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटण्याची घटना घडल्यानंतर ‘एमएसआरडीसी’ने या महामार्गांवर सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी दि. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या दरम्यान दोन टप्प्यात महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  २७ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर मध्यरात्री सुमारे दीड तासाच्या कालावधीत तीन कुटुंबांना धाक दाखवून लुटण्यात आल्याची…

Read More

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे १० प्रवक्ते मांडणार पक्षाची भूमिका ; ‘या’ चेहऱ्यांना मिळाली संधी 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नव्या १० प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध नेत्यांचा समावेश आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे,…

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून रोकड, सोनसाखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला मध्य प्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या….

Read More

साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण ; सर्वसामान्यांना दिलासा

पुणे- सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने परदेशातून शुल्कमुक्त साखर आयात करण्यास परवानगी दिली असून, त्यामुळे साखर व गुळाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता घाऊक बाजारात साखर आणि गुळाच्या दरात घसरण झाली आहे. ऊस उत्पादनात अपेक्षेपेक्षा झालेली मोठी घट आणि सणासुदीपूर्वी वाढलेली मागणी यामुळे देशात साखरेचे…

Read More

गणेशोत्सवात डीजे लावण्यास पुणेकरांचा विरोध, गुडलक चौकात निदर्शने

पुणे- गणेशोत्सवादरम्यान कानाचे पडदे फाडणाऱ्या आवाजातील लाऊडस्पीकर्सच्या वापराचा निषेध करण्यासाठी रविवारी गुडलक चौकात कलाकार कट्ट्यावर मोठ्या संख्येने पुणेकर एकत्र आले. ‘जबाबदार नागरिक’ या भावनेतून आयोजित या मोहिमेत सण किंवा सांस्कृतिक उत्सवांच्या विरोधात नसून केवळ अति-आवाजाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांनी हातात फलक घेऊन आयोजकांना जबाबदारीने उत्सव साजरा…

Read More

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून फायरिंगचा सराव केल्याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलिसांची कारवाई

पुणे- बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून वाडेबोल्हाई येथे फायरिंगचा सराव केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पिंपरी सांडस येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान एक पिस्तूल आणि एक राऊंड जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई सुधीर शिवले यांनी फिर्याद दिली असून ऋषीकेश वामन भोरडे (वय २७, रा. पिंपरी सांडस) आणि प्रणव संदीप भोरडे (वय १९, रा….

Read More

आता बोला ! पुण्यात न्यायाधीशांच्या बंगल्यात चोरी, ते ही दुसऱ्यांदा !

पुणे- जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर येथे कार्यरत सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कौस्तुभ नागेश मराठे यांच्या वारजे येथील बंगल्यात १८ ऑगस्ट रोजी पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, ९ मे रोजी याच बंगल्यात एसीचा कॉम्प्रेसर आणि कॉपर वायर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबतची माहिती अशी की, १८ ऑगस्ट…

Read More

तब्बल १७ दिवसांच्या आंदोलनानंतर आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा 

पुणे – मांजरी येथे मागील १७ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर पुण्याच्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते आंदोलकांनी ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागे घेतले. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी…

Read More