ब्रेकिंग न्यूज

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे उदघाट्न पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार! पण कधी?

पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हिंजवडी मेट्रो कधी सुरु होणार हा प्रश्न पुणेकरांकडून सातत्याने विचारला जात होता. या मार्गाची चाचणी देखील करण्यात आली होती. दिरंगाईमुळे या मेट्रोचे मिम्स बनवले गेले. पण मेट्रो कधी सुरु होणार याबाबत ठोस माहिती…

Read More

पुण्यातील विषारी गावठी दारू प्रकरणात आणखी दोघांना अटक

पुणे- विषारी गावठी दारू प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. आर्यन संजीव धोत्रे (वय २४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत हडपसर पोलीस…

Read More

राहुल गांधी पुन्हा पुणे दौऱ्यावर ? मांजरी येथील आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेणार ?

पुणे- लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असून ते मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणस्थळी भेट देऊन या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहिती काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांनी दिली आहे. पुण्यात झालेल्या ‘छात्रों क गूंज’ कार्यक्रमात निशा साबळे या विद्यार्थिनीने लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासमोर…

Read More

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

पुणे- सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि सनीज वर्ल्ड यांच्या वतीने संयुक्तपणे पुढाकार घेण्यात आला आहे. एसीपी सत्यजीत आदमाने आणि वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राकेश गुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने सनीज…

Read More

‘ती’ आईशी भांडून घराबाहेर गेली आणि….रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या मृत्यूचे कारण आले समोर… 

बारामती – आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणाच्या तपासाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी…

Read More

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस, एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

पुणे- मांजरी इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारले आहे. उपोषणाचा आज तेरावा दिवस असून एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्यामुळे ४ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील विविध सामाजिक संघटना,…

Read More

विमा बचत योजनेच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक

पुणे- विमा बचत योजनेची मुदत सायबर चोरटयांनी वाघोलीतील एका इसमाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने एका खासगी कंपनीच्या आयुर्विमा बचत योजनेत गुंतवणूक केली होती. सायबर चोरटयाने त्यांच्याशी संपर्क साधून बचत योजनेची मुदत…

Read More

पुण्यात रेल्वेच्या बुकिंग क्लार्कला लुटणाऱ्या तिघांना डोंबिवली येथून अटक

पुणे- पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून रोख रक्कम, सोन्याची साखळी व दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवली (पूर्व), ठाणे येथून तिघांना जेरबंद केले आहे. जितेंद्र मोतीराम (२४, रा. जळगाव) आणि ईश्वर गोरख चव्हाण (२३, रा. संभाजीनगर),…

Read More

कृषिपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारा सराईत गजाआड, १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

दौंड- कृषिपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोज गुलाब बिद (वय ३७ वर्षे, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या मांजरी फार्म, ता. हवेली) असे या चोरट्याचे नाव आहे. ग्रामीण भागात शेतातील विहिरी किंवा विंधन विहिरींवर…

Read More

वाहनांना धडका देत निघालेल्या भरधाव ट्रकमधून चालकाने मारली उडी

शिरूर – शिरूरकडून राजगुरूनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर धावत्या ट्रकमधून चालकाने उडी मारल्याची थरारक घटना शिरूर जवळील अन्नापुर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरकडून राजगुरूनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने अन्नापूर परिसरात धावत्या ट्रकमधून अचानक उडी मारली. चालकाने उडी मारताच…

Read More