ब्रेकिंग न्यूज

‘क्या बोलती पब्लिक’ कॉकरोच जनता पार्टीची नवीन मोहीम ; अभिजित दिपके यांची घोषणा

छ. संभाजीनगर- कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबर २०२६ पासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही नवीन मोठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेची अधिकृत घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीनंतर केली. या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी देशातील 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा हा सर्वात मुख्य मुद्दा…

Read More

पुण्याची ओळख MH 12 कायम राहणार ; नवीन वाहन नोंदणी क्रमांक कसा असू शकतो ?

पुणे- पुण्याच्या MH 12 या वाहन नोंदणी कोडची ZZ ही शेवटची मालिका सुरु असून हा कोड इतिहासजमा होणार, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र हा कोड कायम ठेवण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. गडकरी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुण्याची ओळख असलेला MH…

Read More

ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात, मोहन भागवत यांनी साधला ‘जेन झी’शी संवाद

मुंबई- आंदोलन हा डायलॉगचा प्रकार आहे. ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात. आत्ता जे झालं ते ग्रेव्हिएन्सेस आहे. शिक्षण व्यवस्थेत अनेक गोष्टी व्यवस्थित नाहीत, बदल करायला हवा असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मला डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हंटलं, तर मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असेही मोहन भागवत म्हणाले. मुंबईत मोहन भागवत…

Read More

आधी संप मागे घ्या, मगच ऐकून घेऊ : निवासी डॉक्टरांना न्यायालयाने खडसावले !

मुंबई- होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सुमारे ७ हजार निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि रुग्णसेवा पार कोलमडली आहे. या संपावर स्वतःहून दखल (Suo Motu) घेत मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दांत कानउघाडणी केली आहे. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांच्या भूमिकेवर…

Read More

पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत: प्रारूप यादी २४ ऑगस्टला

पुणे- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नसल्याने आणि दोन लाख मृत मतदार आढळून आले आहेत. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतुन ही नावे वगळण्यात येणार आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीना कळसकर यांनी दिली आहे. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या सुमारे १२ ते १३ लाखांनी घटण्याची…

Read More

मोशी बायोगॅस प्रकल्पात हजारो कोटींचा आर्थिक व्यवहार?; नगरसेवक संदीप वाघेरे, सुलभा उबाळे यांचा निविदेला विरोध 

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत मोशी कचरा डेपो येथे ३७५ मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (DBFOT) तत्त्वावर उभारण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर नगरसेवक संदीप वाघेरे आणि सुलभा उबाळे यांनी संशय व्यक्त केला आहे.  संदीप वाघेरे म्हणाले की, प्रकल्पासाठी सुरुवातीचा अंदाजित खर्च सुमारे १८० कोटी रुपये असताना, प्रतिटन ३,६११ रुपये…

Read More

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या ; आमदार विक्रम काकडेंची मागणी

पुणे- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्राच्या विकासात गेली चार…

Read More

‘हर्षवर्धन सपकाळ जाहीर माफी मागा’, पिंपरी चौकात राष्ट्रवादीची निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दावरून राज्यात गदारोळ माजला आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देखील पिंपरी चौकात काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना योगेश बहल म्हणाले की, स्वर्गीय अजितदादांच्या…

Read More

वैशाली नागवडे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

मुंबई- खामगाव (तालुका दौंड) येथील वैशाली नागवडे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. माजी महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर सदर पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या म्हणून वैशाली…

Read More

सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेचा रुपाली चाकणकर यांच्याकडून निषेध, सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमधून म्हणाल्या…

मुंबई- सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. एखाद्या महिलेच्या कर्तृत्वाला उत्तर देता येत नसेल,…

Read More