ब्रेकिंग न्यूज

शरद पवार यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबरला पंढरपूर येथे ‘दुष्काळ आक्रोश मोर्चा’ 

Share

पुणे – महाराष्ट्रात भीषण दुष्काळाने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही मदत जाहीर झाली नाही. या पार्श्वभूमीवर, शरद पवार आता मैदानात उतरले असून २६ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वात पंढरपूरमध्ये “दुष्काळ आक्रोश मोर्चा” आयोजित केला आहे.

दुष्काळी दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. ‘सरकारला सदबुद्धी देवो…’ असे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी आमचे आमदार आणि खासदार शेतकरी मोर्चापूर्वी विठ्ठल मंदिरात जाणार आहेत. येत्या २६ सप्टेंबर रोजी पंढरपुरात आम्ही मोर्चाचं आयोजन केलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.

दरम्यान, दुष्काळाचा जीआर शनिवारपर्यंत काढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे दोन दिवसात जीआर निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.