ब्रेकिंग न्यूज

चाकण एमआयडीसीमधील रस्ते दुरुस्तीसाठी ३१ ऑगस्ट डेडलाईन, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेतली. या बैठकीत ३१ ऑगस्ट पर्यंत चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या गंभीर समस्येने त्रस्त झालेल्या उद्योजकांनी…

Read More

कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे…

Read More

नीलम गोऱ्हेंच्या टीकेला सुषमा अंधारेंचं सडेतोड उत्तर; “नावात ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवं होतं”

मुंबई – शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्या आडनावावरून केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे…

Read More

राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

पुणे- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. छात्रों की गूंज, या विशेष उपक्रमांतर्गत ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. एसएसपीएमएस मैदानावर सायंकाळी ५  वाजता हा संवाद सोहळा होणार आहे. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस जोरदार तयारीला लागली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या…

Read More

चाकणच्या वाहतूक आणि औद्योगिक समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती

चाकण- चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी आणि प्रलंबित समस्यांमुळे येथील उद्योजकांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महत्वाचे पॉल उचलले आहे. राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापन केली आहे. येत्या १० महिन्यात या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात…

Read More

मोठी बातमी : राजधानी दिल्लीमध्ये हायकोर्टसह ६ ठिकाणी बॉम्बची धमकी, तपास यंत्रणा सतर्क 

नवी दिल्ली- राजधानीतील दिल्ली हायकोर्टसह आणखी 5 महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची ई-मेलद्वारे धमकी आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक माहिती समोर आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने हायकोर्टाच्या अधिकृत मेलवर स्फोट घडवण्याची धमकी पाठवली. मेल मिळताच न्यायालय परिसर तात्काळ बंद करून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. परिसराची…

Read More

पिंपरी महापालिकेच्या मुख्यालयात झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे

महापालिकेच्या मुख्यालयात झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे पिंपरी- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, माजी आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात लावण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारामुळे हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला…

Read More

राज्यात लवकरच महाआधार एकात्मिक ओळखक्रमांक, सर्वसामान्यांना याचा फायदा काय?

मुंबई – राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी ‘महाआयडी’ नावाचा एक विशेष डिजिटल एकात्मिक ओळख क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मूळ आधार कार्डशी थेट संलग्न असणार आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाना दिले आहेत. सर्व प्रकारच्या सेवा नागरिकांना घरबसल्या आणि पारदर्शकपणे…

Read More

माजी जिल्हाधिकारी महेश झगडे यांची सिंहस्थ कुंभमेळा विषयी फेसबुक पोस्ट चर्चेत; काय म्हणाले महेश झगडे ?

नाशिक- नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होत असलेल्या विकासकामांमुळे अगोदरच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आता माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या दरम्यान होणार आहे. त्यामुळे…

Read More

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्योजकांना फोन, उद्योगधंद्यांच्या स्थलांतर विषयी या दिवशी घेणार बैठक

देशातील आघाडीचे ऑटोमोबाईल हब असलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसी मधील २० हून अधिक लघुउद्योगांनी खराब रस्ते, तीव्र वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांना कंटाळून सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संभाव्य स्थलांतराची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. येथील उद्योजकांसोबत बैठक आयोजित केली असून या बैठकीत उद्योजकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी…

Read More