ब्रेकिंग न्यूज

चक्कर आलेल्या पोलिसाच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुग्णवाहिकेसोबत थेट रुग्णालय गाठले

Share

पुणे- ठाणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची तब्येत अचानक बिघडल्याचे घटना घडली. कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांना चक्कर आली. उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने धाव घेत नलावडे यांना आपल्या सुरक्षेच्या ताफ्यातून ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. या घटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला.

ठाण्यातील साकेत हेलिपॅडवर हा प्रकार घडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे सकाळपासूनच उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत होते. सकाळी ठाण्यातील टेंभी नाका येथील आई दुर्गेश्वरीचे मंडप पूजन करून उपमुख्यमंत्री शिंदे हे पुण्याला अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. त्यानुसार ठाण्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री शिंदे हे साकेत हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरद्वारे पुण्याला रवाना झाले. अवघ्या काही तासात नानांकडे जाऊन पुढील कार्यक्रमासाठी पुन्हा ठाण्यातील त्याच हेलिपॅडवर लँड होत असताना त्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत असलेले संजय नलावडे हे अचानक चक्कर येऊन कोसळले.

सहकाऱ्यांनी नलावडे यांना रुग्णवाहिकेत दाखल केले होते. मात्र शिंदे यांनी तत्काळ रुग्णवाहिका ज्युपिटर रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या आणि स्वतः आपल्या ताफ्यासह रुग्णवाहिकेच्या पुढे राहून ती रुग्णालयापर्यंत पोहोचवली. त्यानंतर नलावडे यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. “लागतील ते सर्व उपचार करा, खर्चाची काळजी करू नका,” अशा सूचना शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. नलावडे यांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिंदे हे फोनवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत.

सहकाऱ्यांनी नलावडे यांना रुग्णवाहिकेत दाखल केले होते. आपल्या समोरच पोलीस कोसळल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरून थेट त्यांच्याकडे धावत गेले. तोपर्यंत इतर सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णवाहिकेत आणून ठेवले होते. शिंदे यांनी तत्काळ ही रुग्णवाहिका ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः ही रुग्णवाहिका पुढे ठेवत आपल्या ताफ्यातून ती ज्युपिटर रुग्णालयापर्यंत घेऊन गेले.

यानंतर त्यांनी नलावडे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टराना सांगितले. “लागतील ते सर्व उपचार करा, खर्चाची काळजी करू नका,” अशा सूचना शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. स्वतः उपमुख्यमंत्री पोलिसाला घेऊन रुग्णालयात घेऊन आल्याचे कळताच उपायुक्त प्रशांत कदम आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट हे देखील तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात आले. तोपर्यंत नलावडे यांच्यावर डॉक्टरांनी पुढील उपचार सुरू केले होते.

दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे नंतर आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी मुंबईकडे रवाना झाले .नलावडे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस निरीक्षक विजय सांगाडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळीही त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. मात्र तरीही सांगाडे यांचा जीव वाचू शकला नाही.