१,२८० विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तके द्या; दोषींवर कारवाई करा – नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी- : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सुमारे १,२८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करावा तसेच या प्रकरणास जबाबदार…
