ब्रेकिंग न्यूज

मोशी दुर्घटनेतील मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नीची आत्महत्या, परिसरात हळहळ 

मोशी- पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो जवळील इमारत दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांची पत्नी सोनाली नागेश गायकवाड यांनी पतीच्या वियोगाने आत्महत्या करत जीवन संपवले. या हृदयद्रावक घटनेने त्यांच्या दोन लहान मुली पोरक्या झाल्या असून गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली गायकवाड यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  गेल्या…

Read More

आळंदीमध्ये बालविवाहाचा धक्कादायक प्रकार, नातेवाईकांसह मंगल कार्यालय संचालकांना अटक

पुणे- नवरीचे वय १८ आणि नवरदेवाचे कायदेशीर वय २० असताना त्यांचा विवाह लावून दिल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मंगल कार्यालयाच्या संचालकांसह नातेवाइकांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवाच्या आळंदीमध्ये अलंकापुरी मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. विवाहाच्या वेळी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होते, परंतु मुलाचे (नवरदेवाचे) वय २० वर्षे…

Read More

आपले नाव मतदार यादीमधून वगळले जाऊ शकते, आजच एसआयआर गणना अर्ज भरा

मुंबई- राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अद्याप सुमारे १ कोटी ८० लाख मतदार गणना या प्रक्रियेबाहेर राहिल्याची माहिती समोर आली आहे. या उर्वरित मतदारांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंतचीच अंतिम मुदत शिल्लक आहे. विहित मुदतीत त्यांनी अर्ज न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची…

Read More

गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची रोकड लुटून चोरटे पसार 

पिंपरी – थेरगाव परिसरात पहाटेच्या वेळी एक थरारक घटना घडली आहे. रुग्णालयाबाहेर उभ्या केलेल्या कारच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याला रोखणे व्यापाऱ्याला भलतंच महागात पडलं. या व्यापाऱ्याच्या गळ्याला कोयता लावून रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नीरज हकीम सोळंके (वय २१) आणि सूरज हकीम सोळंके (वय १९) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आनंदराव…

Read More

नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर गडकरी यांचे संबंधीत विभागाला तात्काळ निर्देश पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत मार्गी लागणार असून त्यानंतर लागलीच हे काम सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने लक्ष घालून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी…

Read More

कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली- कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा किंवा मानवी तस्करीचा गुन्हा (FIR) दाखल केलाच पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्यांना राज्यांच्या गृह सचिव, पोलीस महासंचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात दररोज अनेक व्यक्ती बेपत्ता होतात. विशेषतः अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे….

Read More

कंटेनरने तीन वाहनांना दिली भीषण धडक ; खासदार निलेश लंके यांच्या मित्रासह एकाचा जागीच मृत्यू

पुणे- भरधाव कंटेनरने दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे- अहिल्यानगर रस्त्यावर शिरूरजवळ संग्राम हॉटेलसमोर घडला. या अपघातात खासदार निलेश लंके यांच्या जिवलग मित्राचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर अत्यंत वेगात आला आणि त्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवले. या विचित्र दुर्घटनेत एसटी महामंडळाची बस, एक फोर्ड एंडेव्हर कार, दुचाकी आणि…

Read More

मोशी प्राधिकरणातील नागरिक विजेच्या लपंडावापासून होणार मुक्त,  नगरसेवक तुषार सहाणे यांच्या प्रयत्नांना यश 

पिंपरी- मोशी प्राधिकरण सारख्या उच्चभ्रू वसाहती मध्ये राहूनही वीज जाण्याचं प्रणाम खूप मोठया प्रमाणात होते. नगरसेवक तुषार सहाणे यांच्या पाठपुराव्यामुळे डीपीडीसी (DPDC) योजनेअंतर्गत या भागात लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. मोशी प्राधिकरण भागात गेल्या काही महिन्यांपासून पासून विजेचा लपंडाव सुरु होता. वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी तसेच विद्यार्थी, गृहिणी, विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय या…

Read More

पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तळेगावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोन जखमी 

शिरवळ -सातारा-पुणे रस्त्यावर शिरवळजवळ भरधाव कार डिवायडरला धडकून उलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ हॉटेल शिवालयसमोर ११ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वेदांत अर्जुन वारिंगे (रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (रा. कामशेत, मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (रा….

Read More

‘मुळशी पॅटर्न’च्या नावाने पुन्हा मुळशीची बदनामी नको; मुळशीकर आक्रमक

  पुणे -‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामुळे मुळशी तालुक्याची गुन्हेगारी अशी चुकीची ओळख निर्माण झाली असून, त्याचे दूरगामी परिणाम आजही मुळशीकरांना भोगावे लागत असल्याची भावना मुळशीकरांकडून व्यक्त होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विवाहाच्या बाबतीतही मुळशीकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुळशी हा वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि कुस्तीगिरांचा तालुका आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ ही गुन्हेगारीची…

Read More