ब्रेकिंग न्यूज

कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे…

Read More

मोरवाडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पिंपरी- नव्याने स्थापन झालेल्या मोरवाडी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर या होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मोरवाडी…

Read More

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 37 अधिकारी आणि अंमलदारांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

पुणे- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह 21 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवापदक व उत्कृष्ट सेवापदक मिळाले आहे. तर 15 पोलीस अधिकाऱ्यांना…

Read More

सहा वर्षाच्या चिमुरड्याला घरी बोलावून..आळंदीमधील संतापजनक प्रकार

पिंपरी – अवघ्या ६ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना आळंदी (ता. खेड) येथे घडली.  मिळालेल्या माहितीनुसार, एका १९ वर्षीय तरुणाने ६ वर्षांच्या अल्पवयीन निष्पाप मुलाला फूस लावून आपल्या घरात बोलावून त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार जुलै महिन्यापासून ते ८ ऑगस्ट या दरम्यान…

Read More

वाहतूक पोलिसांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा, काय आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा आदेश ?

पुणे- वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा, त्यातून वाढती वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांना आळा घालावा अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार दिल्या आहेत. तसेच अंमलदारांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा करून दंडाच्या कारवाईला तात्पुरता विराम दिला आहे. हा आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. वाहतूक विभागाने प्रमुख चौक, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची…

Read More

राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

पुणे- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. छात्रों की गूंज, या विशेष उपक्रमांतर्गत ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. एसएसपीएमएस मैदानावर सायंकाळी ५  वाजता हा संवाद सोहळा होणार आहे. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस जोरदार तयारीला लागली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या…

Read More

चाकणच्या वाहतूक आणि औद्योगिक समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती

चाकण- चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी आणि प्रलंबित समस्यांमुळे येथील उद्योजकांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महत्वाचे पॉल उचलले आहे. राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापन केली आहे. येत्या १० महिन्यात या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात…

Read More

प्रेमसंबंधाच्या संशयाने पत्नीला संपवून पतीची आत्महत्या , खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

पिंपरी- पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयाने पछाडलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली. प्रियांका मारुती इगवे असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून महादेव मारुती इगवे असे खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मानसिक नक्षलवादावर नेमके काय म्हणाले ?

मोदीनी लाल किल्ल्यावर 13 व्या वेळी फडकावला तिरंगा नवी दिल्ली- सशस्त्र नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात देशाला मोठे यश मिळाले असले, तरी माओवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या तथाकथित ‘मानसिक नक्षलवाद्यां’ना ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता तिरंगा…

Read More

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा होणार राष्ट्रपती पदकाने सन्मान ; अशी आहेत मानकऱ्यांनी नावे

पुणे – यंदा महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकार्‍यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले. ३७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक तसेच २० पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपतीचे शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनातून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीचे विशिष्ट सेवा पोलीस पदक शिरीष…

Read More