ब्रेकिंग न्यूज

वाहनधारकांनो सावधान ! चलन मिळाल्यानंतर ‘इतक्या’ दिवसात दंड भरावा लागेल, अन्यथा…

नव्या केंद्रीय मोटार वाहन नियम १६७ च्या सुधारणेनुसार चलन मिळाल्यापासून ४५ दिवसांत दंड भरणे किंवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांसह त्याला आव्हान देणे अनिवार्य आहे. या मुदतीत हरकत घेतली नाही, तर संबंधित चलन स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल. नव्या तरतुदीनुसार पोलिस किंवा अधिकृत अधिकारी चलन प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करू शकतील. इलेकक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणांद्वारे चलन आपोआप तयार…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये होणार

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला अधिसभेने शुक्रवारी सशर्त मान्यता दिली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये महाविद्यालये कुठे सुरु करणार, आजूबाजूला किती महाविद्यालये आहेत, याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या सभेला प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ….

Read More

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व वाहतूक सुविधांच्या कामांना गती द्या, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

चाकण – चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील कंपनीच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. यावेळी एमआयडीसी अंतर्गत रस्ते, तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात…

Read More

पिंपरी महापालिकेच्या मुख्यालयात झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे

महापालिकेच्या मुख्यालयात झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे पिंपरी- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, माजी आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात लावण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारामुळे हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला…

Read More

राज्यात लवकरच महाआधार एकात्मिक ओळखक्रमांक, सर्वसामान्यांना याचा फायदा काय?

मुंबई – राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी ‘महाआयडी’ नावाचा एक विशेष डिजिटल एकात्मिक ओळख क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मूळ आधार कार्डशी थेट संलग्न असणार आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाना दिले आहेत. सर्व प्रकारच्या सेवा नागरिकांना घरबसल्या आणि पारदर्शकपणे…

Read More

शिक्षण स्वतःला सक्षम करण्याचे माध्यम – अंकिता पाटील ठाकरे, पीसीयू मध्ये ‘दीक्षारंभ’ सोहळा संपन्न

पिंपरी- शिक्षण हे स्वतःला सक्षम करण्याचे आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचे माध्यम आहे. तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर मनोरंजन शिवाय ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी करावा. तसेच व्यावसायिक जीवनात पदार्पण केल्यानंतर समाजासाठी योगदान देण्याची भावना जोपासावी असे मार्गदर्शन पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन सदस्य अंकिता पाटील ठाकरे…

Read More

ट्रीपच्या अगोदर नो ‘टीप’ ! कॅब कंपन्यांच्या मनमानीला केंद्र सरकारचा चाप

नवी दिल्ली- कॅब किंवा रिक्षा बुक करताना किंवा प्रवासादरम्यान आता चालकाला किंवा कंपन्यांना टीप मागता येणार नाही. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार बंदी घालण्यात आली असून सर्व वाहन अ‍ॅग्रीगेटर्सना त्यांच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्समधून हे पर्याय त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक कंपन्या ग्राहकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी अ‍ॅपच्या युझर इंटरफेस (UI) मध्ये राईड…

Read More

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्योजकांना फोन, उद्योगधंद्यांच्या स्थलांतर विषयी या दिवशी घेणार बैठक

देशातील आघाडीचे ऑटोमोबाईल हब असलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसी मधील २० हून अधिक लघुउद्योगांनी खराब रस्ते, तीव्र वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांना कंटाळून सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संभाव्य स्थलांतराची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. येथील उद्योजकांसोबत बैठक आयोजित केली असून या बैठकीत उद्योजकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना कंपनीकडून ४० लाखांची मदत मिळणार 

मोशी – मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना महापालिका प्रशासन, ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनी तसेच शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता…

Read More

लायन्स क्लब भोजापूर गोल्डतर्फे ब्रेस्टफीडिंग वीकनिमित्त जनजागृती

भोसरी – ब्रेस्टफीडिंग वीक जगभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. लायन्स क्लब भोजापूर गोल्डतर्फे जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेले डॉक्टर नेहा विखणकर यांनी स्तनपानाचे महत्त्व, नवजात अर्भकाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे तसेच माता आणि बाळाच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये विविध हॉस्पिटलमधील ४० नर्सेस आणि स्टाफ…

Read More