ब्रेकिंग न्यूज

सांगवीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ९ मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे चालकाच्या विरोधात गुन्हे

Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा कर्णकर्कश आवाज करून ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडल्याप्रकरणी ९ गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे चालक आणि मालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२० सप्टेंबर रोजी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या धडक कारवाईत ५ डीजे मिक्सर, ३ डीजे कन्सोल, ३ लॅपटॉप आणि १ लाइट कंट्रोल मशिन जप्त केली आहे. मिरवणुकीत वापरण्यात आलेले ट्रॅक्टर, ट्रॉली आणि मोठ्या क्षमतेच्या ध्वनिवर्धकांसह संपूर्ण डीजे संचही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे

सांगवी परिसरातील विसर्जन मिरवणुकीत एकूण ९० मंडळे सहभागी झाली होती, त्यापैकी ९ मंडळांनी नियमांचे सरळ उल्लंघन करत डीजेचा दणदणाट केला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आगामी मुख्य विसर्जन मिरवणुकांमध्येही ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई केली जाईल आणि उच्च क्षमतेची डीजे यंत्रणा आढळल्यास ती जागेवरच जप्त केली जाईल.