पुणे – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) तब्बल ४,४६२ सदनिकांच्या सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हाडातर्फे २४ ऑगस्ट रोजी ४,४६२ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि १५ सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख होती. मात्र, ऑनलाइन कागदपत्रे अपलोड आणि पडताळणी करताना अनेक नागरिकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे अर्जदारांना दिलासा देत म्हाडा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. अर्जाची मुदत थेट एका महिन्याने वाढवून १५ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. आता २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता म्हाडाच्या या घरांची लॉटरी काढली जाणार आहे.
या सोडतीमध्ये पुणे आणि आसपासच्या भागात एकूण ४,४६२ सदनिका उपलब्ध आहेत. पुणे महापालिका क्षेत्र: १,४६८ घरे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र: १,४०६ घरेपीएमआरडीए (PMRDA) क्षेत्र: १,५८८ घरेयामध्ये २०% सर्वसमावेशक योजनेंतर्गत २,९७१ आणि १५% सामाजिक गृहनिर्माण योजनेंतर्गत १,४९१ घरे असून, मागील दोन सोडतींमधील शिल्लक ५५८ घरांचाही समावेश आहे.
