ब्रेकिंग न्यूज

देहूगाव हादरले ! कौटुंबिक कलहातून आयटी इंजिनीअरने पत्नीची हत्या करून गॅलरीतून मारली उडी

Share

देहूगाव – कौटुंबिक कलहातून २६ वर्षीय आयटी इंजिनीअरने आपल्या पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे.नंतर स्वतःवर देखील वार करत दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आयटी इंजिनीअरवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शुभांगी आकाश बारस्कर (वय २८) आणि आकाश रामदास बारस्कर (वय २६) अशी या पतिपत्नीची नावे आहेत.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एका व्यक्तीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी गेले असता आकाश हे रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शुभांगी बेशुद्ध आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.

पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर शुभांगी यांना मृत घोषित केले. आकाश बारस्कर यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुभांगी यांच्या मृतदेहाचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.