ब्रेकिंग न्यूज

विधी संघर्षग्रस्त ५० बालकांनी जाणून घेतला सिंहगडाचा इतिहास, घेतली व्यसनमुक्तीची शपथ

पुणे – गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी एक संवेदनशील आणि मानवतावादी उपक्रम राबवला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने 50 विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी विशेष दुर्गभ्रमण आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे नसून, बालकांचे…

Read More

मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन

पुणे : शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक जावई, नातवंडे असा परिवार आहे. विद्यार्थी चळवळ, अध्यापन, राजकीय-संघटनात्मक कार्य आणि राज्याच्या शिक्षणविषयक धोरण प्रक्रियेत त्यांनी दीर्घकाळ काम केले. ढेकणे…

Read More

अंमली पदार्थ विक्री प्रकरणात दोन परदेशी नागरिकांसह तिघांना अटक

पुणे- पुण्यात अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाने जोरदार कारवाई सुरु केली असून दोन परदेशी नागरिकांसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. विक्रम कालेकर (वय 30, रा. कर्जत, जि. रायगड), सिसे सादिओ ऊर्फ अ‍ॅलेक्स (वय 30, सेनेगलचा नागरिक, सध्या रा. डोंबिवली, जि. ठाणे) आणि जेले बियासमार्क (वय 30, किंगडम ऑफ इस्वातिनीचा नागरिक,…

Read More

हिंजवडीत अनोखे आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्याला राखी बांधून केला प्रशासनाचा निषेध

हिंजवडी- हिंजवडी आणि माण परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी हिंजवडी आणि माण परिसरातील महिलांनी रस्त्यांवरील खड्ड्यांना राखी बांधून अनोखे व उपरोधात्मक आंदोलन केले. ‘आता तूच आमचे रक्षण कर’ असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. हिंजवडीच्या माजी उपसरपंच दीपाली जांभुळकर, माणच्या भूमिपुत्र यशराज पारखी आणि शिवाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

कामगारांची माहिती पोलिसांना न दिल्याने हॉटेल मालकाच्या विरुद्ध गुन्हे दाखल

पुणे- हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्यविषयक माहिती न दिल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी परिसरातील दोन हॉटेलचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी हॉटेल नवनाथ ( गुलटेकडी) याच्या मालकाविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई विनोद दीपक साळवे यांनी फिर्याद दिली आहे.याच स्वरूपाचा दुसरा गुन्हा हॉटेल व्यंकटेश अमृततुल्य ( गुलटेकडी) याच्या मालकाविरुध्द स्वारगेट…

Read More

राहुल गांधी इफेक्ट ? प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठक, मुख्यमंत्र्यांसहित संपूर्ण भाजप पुण्यात

पुणे- पुण्यात येत्या सोमवारी ( दि. ३१) बी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपची इतकी ताकद असतानाही पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता…

Read More

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैल काळाच्या पडद्याआड बैलगाडा मालकांकडून दुःख व्यक्त

वडगाव मावळ- मावळ तालुक्यातील प्रथम ‘भारतकेसरी’ म्हणून ओळख असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओम्या’ बैलाचे गुरुवारी (दि.२७) वारंगवाडी येथे निधन झाले. ओम्याच्या निधनाने मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक, शौकीन तसेच त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील भाजपाचे नेते आणि बैलगाडा मालक रामनाथ वारींगे यांचा…

Read More

पुणे पोलीस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल, काय आहे प्रकरण ?

मुंबई- विविध सण, राजकीय कार्यक्रम आणि सणांनिमित्त काढणाऱ्या येणाऱ्या मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण कमी करण्यात कसूर केल्याचा दावा करून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २७) रोजी ही याचिका दाखल केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. सत्या मुळे यांनी दिली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर…

Read More

थरमॅक्सच्या कामगारांना तीन वर्षांसाठी १७ हजार ४०० रुपयांची वेतनवाढ

पिंपरी- थरमॅक्स कंपनीत त्रैवार्षिक वेतनकरार झाला असून या करारानुसार कर्मचाऱ्यांना तीन वर्षासाठी १७ हजार ४०० रुपयांची वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. हा करार १ मे २०२५ ते ३० एप्रिल २०२८ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. कामगारांच्या एकजुटीमुळे आणि कंपनी व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे हा करार शक्य झाल्याची माहिती संघटनेने दिली. करारानुसार हजेरी बक्षीस योजनेत ५० टक्के वाढ,…

Read More

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत मुन्नाभाईंची हायटेक कॉपी

पुणे- परीक्षेत कॉपी करण्यासाठी कोण काय डोके लढवेल हे काही सांगता येत नाही. सध्याचा जमाना हायटेक आहे, त्यामुळे कॉपी करणारा किंवा परीक्षेत घोटाळे करणारे महाभाग अशाच हायटेक साधनांचा वापर करताना दिसून येतात. असाच प्रकार पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत झाल्याचे उघडकीस आले आहे. पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा कक्षातील प्रश्नपत्रिका स्पाय कॅमेरा लावलेल्या…

Read More