समोरून आलेले वाहन वाचवण्याच्या प्रयत्नात स्कुलबस दुभाजकावर चढली ; काळेवाडीमधील घटना

पिंपरी- समोरून आलेले वाहन वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस रस्ता दुभाजकावर चढून अपघात झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हा अपघात पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरातील तापकीर चौकाजवळ सोमवारी (दि. १२) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडला. बसमध्ये फक्त चालक आणि एक महिला कर्मचारी होते, या दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही.
मात्र या अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. बस दुभाजकावरून बाजूला करण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.





