ब्रेकिंग न्यूज

डॉक्टरांची राज्यस्तरीय कार्यशाळा SPINOCON संपन्न….

पिंपरी -पिंपरी चिंचवड शाखेतर्फे डॉक्टरांसाठीची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा डी वाय पाटील फार्मसी कॉलेज आकुर्डी येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल कौन्सिल फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन – अतिथी NCISM, दिल्ली चे पदाधिकारी डॉक्टर नारायण जाधव, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन MCIM चे रजिस्टर डॉक्टर दिलीप वांगे सर, निमा केंद्रीय शाखा दिल्लीचे…

Read More

माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे -रंगनाथ महाराज नाइकडॆ

  मोशी – माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे आहे.आई लेकराला जन्म देते ,वाढवते, त्याच्या ओंजळीत सार विश्व रीतं करते पण लेकरू मोठ झाल की आईलाच विसरतं म्हणून माणसाची विचित्र अवस्था झाली आहे तर पर्यावरणावर हि वेळ आली आहे.असे मत रंगनाथ महाराज नाईकडे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाविषयी विविध अध्यात्माचे दाखले देत मार्गदर्शन केले….

Read More

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे उदघाट्न पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार! पण कधी?

पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हिंजवडी मेट्रो कधी सुरु होणार हा प्रश्न पुणेकरांकडून सातत्याने विचारला जात होता. या मार्गाची चाचणी देखील करण्यात आली होती. दिरंगाईमुळे या मेट्रोचे मिम्स बनवले गेले. पण मेट्रो कधी सुरु होणार याबाबत ठोस माहिती…

Read More

‘होय मी अंधभक्त !’ अनफॉलो करायचं असेल तर करा ; इशा कोप्पीकरने सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेवर आक्षेप घेतल्यामुळे ट्रोल झालेल्या अभिनेत्री ईशा कोप्पीकरने स्पष्ट शब्दांत “हो, मी देशासाठी अंधभक्त आहे, कोणाला अनफॉलो करायचं असेल तर करा,” असा सडेतोड पवित्रा घेतला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी वापरण्यात आलेल्या अपमानास्पद शब्दांवर ईशा कोप्पीकरने तीव्र संताप व्यक्त…

Read More

रुपाली चाकणकर यांच्या ३५ कोटींच्या हॉटेलचे उदघाटन होताच महिला काँग्रेस नेत्याचा एकच प्रश्न ‘ बाई,…..?’

पुणे- राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कल्याणीनगर मधील पॉश भागात The Nines या नावाने एक बार आणि रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या हॉटेलची किंमत ३५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून काँग्रेसच्या एका महिला नेत्यांने एकच प्रश्न विचारला आहे, ‘बाई एवढी माया आली कुठून?’ दोनच दिवसांपूर्वी या हॉटेलचे उदघाटन करण्यात आले….

Read More

सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद, मातेची मृत्यूशी झुंज

बीड- वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका 19 वर्षीय नवमातेच्या जीवावर बेतले आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद तसेच सोडून दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. सध्या ही तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. संध्या गायकवाड असे या तरुणीचे…

Read More

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव, तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू 

अमरावती – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरिन रुग्णालय) नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे साडेतीन वाजता वेंटिलेटरमधील स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत धुरात गुदमरल्यामुळे ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६ बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार,आज सोमवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयाच्या तिसऱ्या…

Read More

शहरात विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रम उत्साहात

चिंचवड:- संपूर्ण विश्वाला शांती चा संदेश देण्यासाठी विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या विवीध भागातील शिक्षण संस्था, जैन मंदीर, स्थानक या ठिकाणी सुमारे सतरा हजार भक्तांनी सामुदायिक मंत्र पठण केले.जितो चिंचवड-पिंपरी ने कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले. नवकार महामंत्र पठण कार्यक्रम जगातील १०८ देशात घेण्यात आला.मुख्य कार्यक्रम दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

Read More

एमओसी कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे कल्याणी नगर येथे लोकार्पण

पुणे- एम. ओ. सी. कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यात आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर, पुणे येथे रुग्णसेवेसाठी रुजू केले आहे. पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उपचारांसाठी फक्त शासकीय व खाजगी इस्पितळांवर विसंबून राहणे तेथील महागडे उपचार, सेवा सुविधा…

Read More

पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

  पिंपरी, पुणे – वर्षभर धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम राखणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. बुधवारी (दि.२७) “श्रीं”ची प्रतिष्ठापना करून रात्री ९ वाजता, प्रसिद्ध दिग्दर्शक व सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष…

Read More