ब्रेकिंग न्यूज

सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद, मातेची मृत्यूशी झुंज

xr:d:DAFIvmjN_0g:203,j:3670760681,t:23021416
Share

बीड- वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका 19 वर्षीय नवमातेच्या जीवावर बेतले आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद तसेच सोडून दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. सध्या ही तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

संध्या गायकवाड असे या तरुणीचे नाव असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

काय घडले नेमके ?

संध्या गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया होऊन प्रसूती झाली होती. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. मात्र घरी आल्यावर संध्या यांच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या.

बीड तालुक्यातील संध्या सूरज गायकवाड या तरुणीची 1 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात सिझेरियनद्वारे प्रसूती झाली होती. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. पण घरी गेल्यानंतर संध्याच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत गेली. कुटुंबीयांनी तातडीने तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांच्या पोटात काहीतरी अनोळखी वस्तू अडकल्याचे निष्पन्न झाले.

प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयात पार पडलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी संध्या यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद बाहेर काढल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. संध्याचे पती सूरज गायकवाड यांनी बीडच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही वेळ आल्याचा आरोप केला आहे. तर संध्याच्या आईने “मुलीने बाळाला जन्म दिला, पण आता त्या बाळाला जवळ घेण्याचीही तिच्यात ताकद नाही” असे म्हणत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी सीझर शस्त्रक्रिया करणाऱ्या संबंधित महिला डॉक्टर आणि उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.