इंद्रायणीनगर परिसरातील क्रीडा मैदानावरील अतिक्रमणांवर कारवाई करा- नगरसेवक तुषार सहाणे
पिंपरी- चिंचवड महापालिका प्रभाग क्र. ८ इंद्रायणीनगर परिसरातील क्रीडा संकुले, बॅडमिंटन हॉल आणि क्रीडा मैदानावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. या अतिक्रमणांमुळे स्थानिक मुले आणि क्रीडा प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी नगरसेवक तुषार सहाणे यांनी केली आहे. इंद्रायणी, मोशी प्राधिकरण भागातील खेळाची मैदाने आणि क्रीडा…
