ब्रेकिंग न्यूज

कारचालक महिलेने अचानक दरवाजा उघडल्याचे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Share

पुणे- रस्त्यात मोटार थांबवल्यानंतर मागे पुढे न पाहता अचानक कारचा दरवाजा उघडल्यामुळे दरवाजावर आदळून एका दुचाकीस्वार इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुण्यात लष्कर भागात घडली. पोलिसांनी मोटार चालक महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सूर्यकांत लक्ष्मण बिडकर (वय ४२, रा. गवळी वाडा, बुटी स्ट्रीट, लष्कर ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. या प्रकरणी यश गणेश चवंडके (वय २५ रा. गवळीवाडा बुटी स्ट्रीट, लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकर हे ३० जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बुटी स्ट्रीट परिसरातून निघाले असताना क्वार्टर गेट रस्त्यावर कार चालक महिलेने कार थांबवून अचानक दरवाजा उघडला. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून येणारे बिडकर दरवाजावर आदळून खाली पडले. त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लष्कर पोलीस पुढील तपास करत आहेत.