ब्रेकिंग न्यूज

पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, गांजा विकत घेणारे ४३ जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे- कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांची विक्री करणार्‍या दोन सराईत गुन्हेगाराला पकडून त्यांच्याकडे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आलेल्या ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ दुचाकी, तीनचाकी गाड्या, ३५ मोबाईल तसेच २६ हजार ९६० रुपयांचे रोकड आणि ३ किलो गांजा जप्त करण्यात आला. अजु अहमद शेख (रा….

Read More

साहित्य ही महाराष्ट्राची संस्कृती – उदय सामंत

पिंपरी, पुणे – बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. साहित्य आणि साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे…

Read More

एसटी प्रवासातील NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय

‎मुंबई- राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणाऱ्या सवलतींसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी) स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, लाखो पात्र प्रवाशांना अद्याप हे कार्ड मिळाले नसल्याने, गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही…

Read More

कलाविश्वात पिंपरी चिंचवडचे नाव अग्रस्थानी यावे – डॉ. जब्बार पटेल

पिंपरी – पुणे म्हणजे साहित्य कला क्षेत्राचे उगमस्थान अशी ओळख आहे. पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडची ओळख औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवामुळे या शहराची ओळख कला विश्वातही अग्रस्थानी घेतली जाईल.‌ महापालिकेने महोत्सवाला भरीव मदत करून शहराच्या…

Read More

चिंचवडच्या बिजलीनगर भागात ‘महापारेषण’च्या मुख्य वीज उपकेंद्रात स्फोट,परिसरात धुराचे लोट

चिंचवड-महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे. आग नियंत्रणात आणण्यात आली असून बिघाड झालेला भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने…

Read More

पुणेकरांसाठी खुश खबर, ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी खुला. पण…..

पुणे – पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने आणि छोटा साकव वाहून गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला ताम्हिणी घाट पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.   दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करतात. मार्ग बंद असल्याने स्थानिक पर्यटनावर आधारित छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला…

Read More

७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी पूर्णत्वास पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड – सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन १६ ते १८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५…

Read More

बँक ऑफ बडोदाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा गुणगौरव

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर शहर म्हणून ओळखले जाते. यामध्ये पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाबरोबरच सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सफाई कर्मचाऱ्यांबाबत विशेष आदर आहे तसेच त्यांचा गुणगौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे बँक ऑफ बडोदाचे विभागीय विकास व्यवस्थापक रजनीकांत चौधरी…

Read More

महाराष्ट्रातील सर्व सामाजिक घटकांना समान न्याय मिळवून देणार – अण्णा बनसोडे

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील वंचित, पीडित, शोषित, कष्टकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. यासाठी सामाजिक, राजकीय भागीदारीसोबतच मागास घटकांची आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी सामाजिक…

Read More

आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघ विजयी पीसीसीओई मध्ये बास्केटबॉल स्पर्धा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. १६ ऑक्टोबर २०२४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघाने विजेतेपद पटकावले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (दि. १४ व १५ ऑक्टोबर) येथे झालेल्या या मुलींच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर, नाशिक…

Read More