ब्रेकिंग न्यूज

पबमध्ये DJ चा व्हिडिओ काढणे अंगाशी आले ; टोळक्याकडून जबर मारहाण

Share

पुणे – पबमध्ये डि जे चा व्हिडिओ काढणार्‍या इसमाला पबच्या स्टाफने व्हिडिओ काढण्यास मनाई केली. तसेच तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर आता इथून निघ नाही तर खूप मार खाशील असे धमकावले. पबच्या पार्किंगमध्ये ५ जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण करुन फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. ही घटना विमाननगरमधील बॅक स्टेज हॉटेलच्या पार्किंगमध्ये पहाटे अडीच वाजता घडली.

या प्रकरणी हर्षल कैलास कदम (वय ३७, रा. श्रीनाथ अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सिन्नरकर, अक्षय व त्याच्या २ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगरमधील बॅक स्टेज हॉटेल व पबच्या पार्किंगमध्ये २ ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल कदम हे खडकीतील कंपनीत केमिकल प्लॅन्टवर ऑपरेटर म्हणून काम करतात. ते आपले मित्र व सहकारी श्रीकांत कोळापे (रा. बोपखेल) यांच्यासोबत १ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता जेवणासाठी बॅक स्टेज हॉटेल व पब (Backstage Hotel & Pub) येथे गेले होते. तेथून दीड वाजता जेवण झाल्यावर ते मोबाईलमधून डी जे चा फोटो व व्हिडिआ काढत होते. त्यावेळी पबचे कर्मचारी सिन्नरकर याने व्हिडीओ काढण्यास मनाई केली. तसेच तिथून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले. नाहीतर खूप मार खाशील, अशी धमकी दिली.

त्यानंतर ते दोघे खाली पार्किंगमध्ये गेले. तेथे अक्षय नावाचा मुलगा आला त्याने फिर्यादीला म्हटले की ‘तू जा नाही तर तुला लय ठोकेल’ त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. अक्षय याने हर्षल कदम यांच्या डोक्यावर एक फटका मारला. इतर चार मुले तेथे आली. त्यांनी हातातील रॉडने कदम यांच्या दोन्ही हातावर, पायावर रॉडने मारहाण केली. काही मुलांनी श्रीकांत कोळापे यांनाही रॉडने गुडघ्यावर फटके मारले. या मारहाणीत हर्षल कदम याचे घोट्याचे हाड फ्रॅक्चर झाले. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.