ब्रेकिंग न्यूज

पुण्यात भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या योजनेतील भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्रासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या निधीची वाट…

Read More

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली- मोदी सरकारकडून आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. नुकताच राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे…

Read More

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांनी केले जेरबंद, जिवंत काडतूसासह 51 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे- पुण्यात गावठी शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे. बाणेर-वाघोली रस्त्यावरील मित्रानगर परिसरात ही कारवाई केली. विशाल प्रद्याद कलबंडे, (वय 26 वर्षे, रा. ज्ञानेश्वरी हाइट्स, भिलारेवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी यांच्या पथकाला 29 जुलै रोजी बाणेर-वाघोली रस्त्यावरील गंगार्दनजवळ एक इसम…

Read More

मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ, या तारखेपर्यंत भरता येणार एन्युमरेशन फॉर्म

पुणे- मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेली संधी आता 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून द्यावा अशी अनेक पक्षांनी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 दिवसाचा कालावधी वाढवून दिला आहे. निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील प्रारूप (ड्राफ्ट) मतदार याद्या…

Read More

विद्यार्थ्यांकडून नगरसेविकेचे पाद्यपूजन, पुणे महापालिकेच्या शाळेतील प्रकार

पुणे- पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून एका महिला नगरसेविकेचे पाय धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले…

Read More

पीएमपीएमएल बसमधून फक्त ५०० रुपयात घ्या ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद

पुणे- सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा सहलीचा आनंद घेत आहेत. पुणेकर पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. फक्त ५०० रुपयांमध्ये पुणेकरांना मुळशी, ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने त्यासाठी एका विशेष बसचे नियोजन केले आहे. पीएमपीने ९ अ हा नवीन जलद मार्ग सुरु केला आहे. या नवीन विशेष बसचा…

Read More

पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप प्रेम प्रकरणाची मोठी अपडेट

पुणे- बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मंगेश जगताप यांच्याविरोधात एका तरुणीच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध एका तरुणीच्या तक्रारीवरून बलात्कार, फसवणूक…

Read More

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सारसबाग परिसरातील वाहतुकीत असे आहेत बदल

पुणे- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) सारसबाग परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. सारसबाग परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होते. सारसबाग परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या…

Read More

अगोदर पर्यटन, मग पंचनामा… तपासाच्या नावाखाली पर्यटन करणे पुणे पोलिसांना भोवले

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस दलातील वादग्रस्त प्रकरणामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता आणखीन एका प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. तपासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बडगा उगारण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढी अप्पर पोलीस आयुक्त राजेश…

Read More

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे रविवारी ९ तासांचा मेगा ब्लॉक

पुणे- मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे यार्ड (पुणे-दौंड विभाग) येथे रविवारी, (दि. २) सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नऊ तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे- लोणावळा लोकल आणि मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रकातील बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे रेल्वे प्रशासनाने केले आहे. मेगाब्लॉक काळात…

Read More