पुणे- मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले १४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलची किंमत २ लाख २७ हजार रुपये आहे.
प्रणीत नरेंद्र जाधव (वय 20 रा. रम्याच्या पाठीमागे सर्वोदय कॉलनी मुंढवा) आणि राहुल सुरेश सहानी (वय 22 रा राशी वस्ती चौधरी गोठा बाजाज खराडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २८/२०२६ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३०३/२ आणि ३/५ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी या दोन आरोपींना ताब्यात घेतले. या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेले १४ मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाचे मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ चे जीवन बेनिवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभागाचे अतुलकुमार नवाचे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा वाळिंबे, पोलीस निरीक्षक गुन्हे सागर नांदे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस निरीक्षक गणेश जिवघुले, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोमण, रांभाजी नाईक, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, राहुल खोंदे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रुपेश लोहार, सलीम अत्तर, योगेश राऊत, स्वप्नील रासकर आणि अक्षय मुनाळ यांनी केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार विनोद साळुंके करत आहेत.
