ब्रेकिंग न्यूज

रावेत येथील जुन्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Share

पुणे- रावेत येथील पूर्वीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सन १९८५ ते २००० सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्याला सातारा, सांगली, फलटण, कोल्हापूर, चाकण इत्यादी ठिकाणावरून सुमारे ४०० माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित होते. बऱ्याच वर्षानंतर एकत्र आल्यामुळे एकमेकांना भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी समीर लॉन्स येथे हा मेळावा घेण्यात आला. माजी शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर राष्टगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवेश्वर हैलकर गुरुजींनी केले. या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर शिंदे, बसवेश्वर हैलकर, श्रीमती किशोरी पुरोहित, प्रमिला होले, मीनाक्षी लोखंडे, माधुरी घिगे, श्रीमती विजया भोंडवे या माजी शिक्षकांचा ट्रॉफी, शाल,पुस्तक व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नंतर कार्यरत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन गप्पांचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी पाच वाजता चहा पान होऊन एकमेकांचा निरोप घेतला. कार्यक्रमाचे निवेदन कुमारी ऋचिका भोंडवे हिने केले.