सातारा- ग्लोबल फाऊँडेशन पुणे यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पिंपरी चिंचवड शहराचे पैलवान काळुराम लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्लोबल फाऊँडेशनच्या संस्थापाक अध्यक्षा ज्योती जाधव, अभिनेते अतुल कुडले, तेजपाल वाघ, आनंदी जीवन फाऊँडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोशीन पठाण, विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक सत्यजित माने देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी राज्यभरातुन आलेल्या एकुण ६० पुरस्कारर्थींना पुरस्कार देण्यात आले.
पैलवान काळुराम लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय केलेले अतुलनीय कार्य, दीर्घकालीन समर्पित सेवा, समाजातील अनेकांना निस्वार्थपणे दिलेली प्रेरणा आणि आदर्शवत जीवनयात्रेची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्यजित माने देशमुख सर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी बोलताना तेजपाल वाघ म्हणाले की, समाजाच्या विकासाची खरी ताकद ही केवळ मोठ्या योजनांमध्ये नसते, तर त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणार्या माणसांमध्ये असते. समाजातील गरजु, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण, संस्कार आणि आधार निर्माण करण्याचे कार्य करणार्या व्यक्तींचे योगदान निश्वितच प्रेरणादायी असते.
