ब्रेकिंग न्यूज

लायन्स क्लब भोजापूर गोल्डतर्फे ब्रेस्टफीडिंग वीकनिमित्त जनजागृती

Share

भोसरी – ब्रेस्टफीडिंग वीक जगभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. लायन्स क्लब भोजापूर गोल्डतर्फे जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेले डॉक्टर नेहा विखणकर यांनी स्तनपानाचे महत्त्व, नवजात अर्भकाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे तसेच माता आणि बाळाच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये विविध हॉस्पिटलमधील ४० नर्सेस आणि स्टाफ यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

ब्रेस्टफीडिंग वीकदरम्यान आणखी विविध ठिकाणी अशाच प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा मानस डॉ. नेहा विखणकर आणि गणेश नांदेडकर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला लायन्स क्लब भोजापूर गोल्ड क्लबचे संस्थापक डॉ. रोहिदास आणि लायन डॉ. माधुरी आल्हाट, लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षा डॉ. सौम्या साबळे, सेक्रेटरी जयश्री साठे, गणेश नांदेडकर उपस्थित होते