ब्रेकिंग न्यूज

तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला उच्च न्यायालयाचा दणका! ठोठावला ५ लाखांचा दंड

मुंबई – संपूर्ण राज्यात एफडीएकडून होत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच कारवाईबद्दल एफ डी ए ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पुण्यातील मिठाई दुकानाच्या प्रकरणात कोर्टाने सोमवारी एफडीएला पाच लाख रुपयांचा दंड लावून दणका दिला आहे. याबाबतची हकीकत अशी की एफडीएने पुण्यातील गुरूनानक डेअरी…

Read More

चाकण एमआयडीसीमधील रस्ते दुरुस्तीसाठी ३१ ऑगस्ट डेडलाईन, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेतली. या बैठकीत ३१ ऑगस्ट पर्यंत चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या गंभीर समस्येने त्रस्त झालेल्या उद्योजकांनी…

Read More

लोणावळा रेल्वे स्थानकातील पाणी पिताय का ? सावधान ! देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक

नवी दिल्ली- मुंबईसह देशातील अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पिण्याचे पाणी दूषित आणि आरोग्यास हानिकारक असल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकासहित देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक असल्याचा अहवाल भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) ने दिला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ समोर येत असताना रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या…

Read More

UGC-NETच्या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा होणार ; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) प्रश्नपत्रिकांमधील गंभीर त्रुटी आणि चुकांमुळे यूजीसी-नेट (UGC-NET) जून २०२६ च्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. यंदा २२ ते ३० जूनदरम्यान UGC-NET परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेतील इंग्रजी,…

Read More

रात्री जेवून बेडरूममध्ये गेले आणि… नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाने संपवले आयुष्य

नागपूर- नागपूर शहर एका पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे हादरले आहे. पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस क्वार्टरमध्ये मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते…

Read More

पुणेकरांसाठी खुश खबर, ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी खुला. पण…..

पुणे – पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने आणि छोटा साकव वाहून गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला ताम्हिणी घाट पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.   दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करतात. मार्ग बंद असल्याने स्थानिक पर्यटनावर आधारित छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला…

Read More

धक्कादायक! मुंबईत नौदल कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन निष्पाप बालकांसह जीवन संपवले 

मुंबई – एकाच चार मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने मुंबई हादरून गेली आहे. कुलाबा येथील ‘नेव्ही नगर’ परिसरात नौदलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन निष्पाप बालकांसह जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  या दुर्दैवी घटनेत दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या…

Read More

लावणीच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉर सर्टिफिकेट आवश्यक, अश्लीलता असल्यास होणार कारवाई

मुंबई- ग्रामीण भागातील लोकांपासून शहरी प्रक्षकांपर्यंत सर्वांना लावणीचे ठसकेबाज नृत्य पाहायला आवडते. अलीकडच्या काळात लावणीच्या कर्यक्रमामधून अश्लीलतेचे प्रदर्शन होत असल्याचे दिसून येते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. लावणीचा कार्यक्रम सादर करण्यापूर्वी राज्याच्या सेन्सॉरचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष…

Read More

वाढदिवसाचा केक खाल्ला आणि आठजण रुग्णालयात दाखल.. काय होते त्या केकमध्ये ?

मुंबई- वाढदिवसासाठी आणलेला केक खाल्यानंतर सात ते आठ जणांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये उघडकीस आली आहे. या केकमध्ये मृत पाल सापडल्याचा दावा करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10),…

Read More

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्या प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोणंद – मागील आठवड्यात आळंदीमध्ये विवाह लावून दिल्याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकांसह नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच फलटण तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. फलटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर दि….

Read More