ब्रेकिंग न्यूज

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुणे विद्यापीठात Gen-Z चा जल्लोष

पुणे – भर पावसात हातात तिरंगा घेत आणि युवा शक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी जल्लोष साजरा केला. या आनंदोत्सवामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर दुमदुमून गेला. पेपरफुटीच्या घटना, शिक्षणाचे वाढते खासगीकरण आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि ‘कॉकरोच…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी १२ ‘मिसिंग लिंक’प्रकल्पाचे काम सुरु

पुणे- शहरातील विविध भागात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने रखडलेल्या रस्त्यांच्या मिसिंग लिंक जोडण्याचे काम पुन्हा सुरु केले जाणार आहे या वर्षी शहरातील १२ मिसिंग लिंकची कामे करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही कामे पूर्ण केल्याने शहरातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल…

Read More

आषाढी एकादशी उत्साहात साजरी, पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर- संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारंपरिक शासकीय महापूजा संपन्न झाली. सलग २० वर्षे वारी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील माने दांपत्याला यंदा मुख्य पूजेत मुख्यमंत्र्यांसोबत बसण्याचा मान मिळाला. आज पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुरायाची…

Read More

पवना धरण ९३ टक्के भरले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पवना धरण गुरुवारी (दि.२३) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ९३.१० टक्के भरले आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही क्षणी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी नदीपात्रामधील आपले साहित्य, शेती अवजारे कृषी पंप, जनावरे नदीपात्रापासून…

Read More

राज्य मंत्रीमंडळाची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी

मुंबई – राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपला…

Read More

सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यशस्वी 

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नाराजी नाट्य रंगले होते. संजय काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यांना यश आले आहे. पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे…

Read More

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई- आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान…

Read More

भावडी गावची कन्या ऋतुजा मोरे पोलिस दलात दाखल

पिंपरी – आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात असलेल्या भावडी गावातील ऋतुजा बारकु मोरे हिने महाराष्ट्र पोलिस दलात पुणे शहर पोलिस पदावर निवड मिळवत गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. भावडी गावातून पोलिस सेवेत दाखल होणारी ती पहिली महिला ठरली असून,तिच्या या यशामुळे सातगाव पठार परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही …

Read More

तब्बल पन्नास वर्षांनंतर एकत्र आले शाळासोबती…

पिंपरी – सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यमाचा सकारात्मक उपयोग करून काकडे पार्क, चिंचवडगाव येथील ज्येष्ठ नागरिक रमेश कुलकर्णी आणि पुणेस्थित वैशाली क्षीरसागर यांनी दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी अन् अपूर्व उत्साहाच्या बळावर छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सन १९४६ ते १९६३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या शाळासोबत्यांचा व्हॉट्सॲप…

Read More

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी, पुणे – शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते….

Read More