ब्रेकिंग न्यूज

पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आक्रमक, जोरदार राडा, पोलिसांना पाचारण 

पुणे – वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याच्या आरोप करत विद्यार्थ्यांनी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा केल्याचा प्रकार सोमवारी घडला.   हाती आलेल्या माहितीनुसार विशेष परीक्षा देऊनही काही विद्यार्थी पुन्हा नापास झाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्ते…

Read More

मोरवाडी आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्याची सौदी अरेबिया येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड 

पिंपरी – सन 2021- 23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याची सौदी अरेबिया मधील दमाम येथे जूनियर डिझायनर म्हणून निवड झाली.  हा प्रशिक्षणार्थी आयटीआय मध्ये प्रथम व द्वितीय अंतिम परीक्षेत प्रथम आला होता या निकषावर त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्राप्त झाली. नंतर याच कंपनीमध्ये ट्रेनि म्हणून निवड झाली. उत्कृष्ट कामकाज,…

Read More

शिवसेनेचा रोजगार मेळावा, राष्ट्र उभारणीची दहीहंडी – सचिन अहिर 

पिंपरी- पिंपरी चिंचवड शिवसेनेचा रोजगार मेळावा म्हणजे राष्ट्र उभारणीची दहीहंडी आहे. प्रत्येक कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार मिळाला की, ते कुटुंब आर्थिक सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले तरच देश सक्षम होऊन विकसित होईल, असा विश्वास विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार…

Read More

मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाची परीक्षा रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई- राज्यात आणि देशात परीक्षा घोटाळ्याचे रोज नवनवीन प्रकरणे बाहेर येत असतानाच आता आणखी एक परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी 16 ऑगस्टला झालेल्या ऑनलाईन टायपिंग परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केल्यामुळे अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. निवड प्रक्रियेत…

Read More

अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा! – डाॅ. मिलिंद भोई

पिंपरी – ‘अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा आहे. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत परत येऊ शकत नाही. त्याप्रमाणेच चुकून किंवा कुतूहलाने अंमली पदार्थांचे सेवन केल्यास कालांतराने त्याचे पर्यवसान मृत्यूत होते’ असा गंभीर इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांनी दिला.  पिंपरी – चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृहात आयोजित लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी…

Read More

पिंपरी महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आता मोफत सॅनिटरी पॅड दिले जाणार आहेत. २६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ७९ लाख ६७ हजार ४८० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय…

Read More

औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द, फेरपरीक्षा घेण्याचा लोकसेवा आयोगाचा निर्णय 

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने काढला आहे. त्यामुळे आता फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. २२ मार्च २६ रोजी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील ६ विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर…

Read More

महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, राहुल गांधी यांचा प्रहार

पुणे- महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यामुळे महिला या कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (दि.२२) पुण्यात उत्साहात पार पडला. यावेळी जेन झी युवकांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राहुल गांधी…

Read More

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी अभाविप आणि एनएसयूआय च्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्याच्या सीओईपी (COEP) टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल परिसरात तुफान राडा झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनएसयुआयचे कार्यकर्ते हॉस्टेलमध्ये घुसले आणि त्यांनी विद्यार्थिनींवर आगामी कार्यक्रमासाठी नाव नोंदवण्यासाठी जबरदस्ती…

Read More

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी- ‘भारत हा कोणत्याही एका महामानवाचा, एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे अशा सर्व महामानवांच्या मानवतावादी सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत…

Read More