ब्रेकिंग न्यूज

Vedh News

वाहतूक पोलिसांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा, काय आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा आदेश ?

पुणे- वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा, त्यातून वाढती वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांना आळा घालावा अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार दिल्या आहेत. तसेच अंमलदारांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा करून दंडाच्या कारवाईला तात्पुरता विराम दिला आहे. हा आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. वाहतूक विभागाने प्रमुख चौक, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची…

Read More

राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

पुणे- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. छात्रों की गूंज, या विशेष उपक्रमांतर्गत ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. एसएसपीएमएस मैदानावर सायंकाळी ५  वाजता हा संवाद सोहळा होणार आहे. राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस जोरदार तयारीला लागली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या…

Read More

१५ दिवसात मालकी हक्क सिद्ध करा अन्यथा बेवारस वाहन समजून होणार जाहीर लिलाव

पुणे – शहरातील विविध भागांतून हटवण्यात आलेली तब्बल १ हजार ३१७ दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी बेवारस वाहने हडपसरमधील रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथील समर्थनगर वाहन डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात आली आहेत. यामध्ये आपले वाहन असल्यास १५ दिवसात हक्क सांगून वाहन घेऊन जा अन्यथा बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया वाहतूक शाखेने सुरू केली आहे. पोलिस उपायुक्त…

Read More

किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला, डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमधील प्रकार

पुणे – सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट्स करण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे. डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या टोळक्यात दोन मुलींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन येथील ‘फ्लाईंग जिप्सी’ या कॅफेमध्ये पहाटेच्या सुमारास पार्टी रंगली…

Read More

चाकणच्या वाहतूक आणि औद्योगिक समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती

चाकण- चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी आणि प्रलंबित समस्यांमुळे येथील उद्योजकांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महत्वाचे पॉल उचलले आहे. राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापन केली आहे. येत्या १० महिन्यात या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात…

Read More

प्रेमसंबंधाच्या संशयाने पत्नीला संपवून पतीची आत्महत्या , खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

पिंपरी- पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयाने पछाडलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली. प्रियांका मारुती इगवे असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून महादेव मारुती इगवे असे खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मानसिक नक्षलवादावर नेमके काय म्हणाले ?

मोदीनी लाल किल्ल्यावर 13 व्या वेळी फडकावला तिरंगा नवी दिल्ली- सशस्त्र नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात देशाला मोठे यश मिळाले असले, तरी माओवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या तथाकथित ‘मानसिक नक्षलवाद्यां’ना ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता तिरंगा…

Read More

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त, ५ आरोपीना अटक

पुणे- पोलीस रेकॉर्डवरील सराईत ५ गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडील ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथकाने १३ ऑगस्ट रोजी केली. सुफियान बशीर शेख (वय २२, रा. जैन टॉवर समोर, धनकवडी), निलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१, रा. रजनी कॉर्नर, काकडे चाळ, बालाजीनगर), तुकाराम बाबासाहेब गवते (वय…

Read More

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा होणार राष्ट्रपती पदकाने सन्मान ; अशी आहेत मानकऱ्यांनी नावे

पुणे – यंदा महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकार्‍यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले. ३७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक तसेच २० पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपतीचे शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनातून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतीचे विशिष्ट सेवा पोलीस पदक शिरीष…

Read More

वाहनधारकांनो सावधान ! चलन मिळाल्यानंतर ‘इतक्या’ दिवसात दंड भरावा लागेल, अन्यथा…

नव्या केंद्रीय मोटार वाहन नियम १६७ च्या सुधारणेनुसार चलन मिळाल्यापासून ४५ दिवसांत दंड भरणे किंवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांसह त्याला आव्हान देणे अनिवार्य आहे. या मुदतीत हरकत घेतली नाही, तर संबंधित चलन स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल. नव्या तरतुदीनुसार पोलिस किंवा अधिकृत अधिकारी चलन प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करू शकतील. इलेकक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणांद्वारे चलन आपोआप तयार…

Read More