ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मानसिक नक्षलवादावर नेमके काय म्हणाले ?

Share

मोदीनी लाल किल्ल्यावर 13 व्या वेळी फडकावला तिरंगा

नवी दिल्ली- सशस्त्र नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात देशाला मोठे यश मिळाले असले, तरी माओवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या तथाकथित ‘मानसिक नक्षलवाद्यां’ना ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता तिरंगा फडकवला. या ऐतिहासिक स्थळावरून नरेंद्र मोदींचं हे सलग 13 वे स्वातंत्र्यदिन भाषण आहे.

मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचा आणि ‘मोठी स्वप्ने पाहण्याचा’ प्रमुख संदेश दिला. त्यांनी भारताच्या वेगवान प्रगतीसाठी ‘शक्तीची सप्तधारा’ हा नवा कृती आराखडा जाहीर केला. यामध्ये उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, डिफेन्स, ग्रीन व ब्लू अर्थव्यवस्था आणि भारताचा जागतिक प्रभाव या क्षेत्रांमध्ये व्यापक बदलांचे त्यांनी आवाहन केले. तसेच संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी देशवासियांना “लहान स्वप्ने पाहणे बंद करून, २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा” असा स्पष्ट संदेश दिला. तसेच देशातील पूरग्रस्त आणि दरड कोसळल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रति त्यांनी सहसंवेदना व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून शक्तीची सप्तधारा काय आहे ?

देशाला महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधानांनी ७ प्रमुख क्षेत्रांवर भर दिला

उत्पादन क्षेत्र (Manufacturing): भारताला जागतिक पुरवठा साखळीचा (Global Supply Chain) मुख्य केंद्र बनवणे आणि उत्पादनांमध्ये ‘झिरो डिफेक्ट’ (शून्य त्रुटी) राखणे.

शेती आणि अन्न प्रक्रिया (Farming & Food Processing): शेतापासून थेट जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढवणे आणि सेंद्रिय शेतीला चालना देणे.

तंत्रज्ञान (Technology): डेटा सेंटर्स, रोबोटिक्स आणि भारतात ६जी (6G) तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट.

गती शक्ती (Gati Shakti): हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, एक्स्प्रेस वे आणि शहरांना हाय-स्पीड रेल्वेने जोडणे.

संरक्षण शक्ती (Raksha Shakti): संपूर्ण स्वदेशी बनावटीची संरक्षण उत्पादने, सुपरसॉनिक आणि ड्रोन तंत्रज्ञानावर भर.

हरित आणि निळी अर्थव्यवस्था (Green & Blue Economy): अक्षय ऊर्जा आणि सागरी संसाधनांचा विकास.

सॉफ्ट पॉवर (Soft Power): योग, आयुर्वेद आणि पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताची ओळख मजबूत करणे

तरुणांसाठी पंतप्रधानांनी कोणत्या घोषणा केल्या.?

एआय (AI) प्रशिक्षण: देशातील १ कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (AI) मोफत प्रशिक्षण दिले जाईल.

मोफत ऑनलाइन कोचिंग: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोफत ऑनलाइन कोचिंग सुरू करणार.

स्पोर्ट्स टॅलेंट हंट: ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधील क्रीडा गुणांना शोधण्यासाठी देशभरात मोठी मोहीम राबवली जाईल.