महाळुंगे येथे रस्त्यावरील खड्ड्याने घेतला ११ वर्षीय मुलाचा जीव
पुणे – रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा ट्रक खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती अशी की ११ वर्षाचा मुलगा त्याचे वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून ट्यूशनला जात होता. रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरल्यामुळे मुलगा रस्त्यावर पडला…
