ब्रेकिंग न्यूज

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

Indian farmer holding crop plant in his Wheat field
Share

नवी दिल्ली- मोदी सरकारकडून आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. नुकताच राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे लाभार्थी असलेले शेतकरी सध्या या योजनेच्या 24 हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचवेळी केंद्र सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता योजनेला पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे २०३०-३१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा 24 वा हप्ता शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २३ हप्त्यांमध्ये ४.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. आकडेवारीनुसार सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,९८४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती.