ब्रेकिंग न्यूज

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने डाॅक्टर,सी.ए.व फार्मर्स डे सेलिब्रेशन

पिंपरी वेध न्यूज –  रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने दि.१ जुलै रोजी डाॅक्टर्स डे,सी.ए.डे व फार्मर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोटरी नवीन वर्ष २०२५-२६ ची सुरुवात गणपती पूजन, दिपप्रज्वलन व उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रो.डाॅ.संतोष मोरे, सचिव रो.डाॅ.योगश गाडेकर तसेच नवीन कार्यकारिणी सदस्य यांच्या नावाची घोषणा मावळते अध्यक्ष…

Read More

प्रेमसंबंधाच्या संशयाने पत्नीला संपवून पतीची आत्महत्या , खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

पिंपरी- पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयाने पछाडलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली. प्रियांका मारुती इगवे असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून महादेव मारुती इगवे असे खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये होणार

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला अधिसभेने शुक्रवारी सशर्त मान्यता दिली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये महाविद्यालये कुठे सुरु करणार, आजूबाजूला किती महाविद्यालये आहेत, याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या सभेला प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ….

Read More

आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक 

पुणे – धायरी परिसरातील मुठा कालव्याशेजारी असलेल्या पिनाक आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत धातूचे साहित्य तसेच मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली. आकाश बाळू ननावरे (वय ३२, रा. दत्तवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी स्वतंत्र तपास पथक नेमले…

Read More

अजित गव्हाणे यांना निवडून आणण्यासाठी युवा सेनेची ताकद पणाला लावणार

भोसरी –भाजपचा एक एक उमेदवार विधानसभेच्या निवडणूकीत पराभूत करणे हा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा मुख्य अजेंडा असला पाहिजे. ज्या भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चोरण्याबरोबर, सरकार पाडण्यापर्यंत निंदनीय काम केले. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा निर्धार युवा सेनेच्या मेळाव्यात करण्यात आला. भोसरी विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षात दाखवण्यासारखे काहीच काम केले नाही म्हणून आता…

Read More

कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे…

Read More

सुर्वे माणुसकीचा कैवार घेणारे कवी! – डाॅ. श्रीपाल सबनीस

पिंपरी – ‘नारायण सुर्वे हे माणुसकीचा कैवार घेणारे कवी होते!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस  यांनी आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे…

Read More

पुणे रेल्वे स्टेशनवर लूटमार, रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून ५ लाखांचा ऐवज लुटला

पुणे- पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून, हात-पाय बांधून व तोंडात रुमाल कोंबून रोख रक्कम, सोन्याची साखळी व दोन मोबाईल असा एकूण ४,९१,६२५ रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री १ च्या सुमारास घडली. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलोनी मुंढवा…

Read More

सराफ व्यापार्‍यांचे 90 लाखांचे सोन्याच्या दागिन्यांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय गायब

पुणे – सराफ व्यापार्‍यांचे सोन्या चांदीचे ९० लाख रुपयांचे दागिने असलेले १४ पार्सल घेऊन कुरियर बॉय पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईला जाणार्‍या डिलिव्हरी बॉयने पार्सल मुंबईत पोहचविण्याऐवजी ते दागिने घेऊन तो पळून गेला. ही घटना ५ ऑगस्ट २०२६ रोजी साडेपाच वाजता घडली. याबाबत जितेंद्र ऋषिकेश सिंह (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी…

Read More

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

पिंपरी प्रतिनिधी : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक भान जपत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान विविध आरोग्य व जनहिताच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,समाजाने मला दिलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल मी सदैव ऋणी आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त…

Read More