मुंबई- आंदोलन हा डायलॉगचा प्रकार आहे. ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात. आत्ता जे झालं ते ग्रेव्हिएन्सेस आहे. शिक्षण व्यवस्थेत अनेक गोष्टी व्यवस्थित नाहीत, बदल करायला हवा असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मला डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हंटलं, तर मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असेही मोहन भागवत म्हणाले. मुंबईत मोहन भागवत यांनी आज जे झीशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आयआयएमयुएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी त्यांची मुलाखत घेतली.
काय म्हणाले मोहन भागवत ?
आंदोलन सुद्धा संवादाचा एक प्रकार आहे. आपण बसलोय, बोलतोय, आपण चर्चा करू. प्रश्न सुटला नाही तर मी आरडाओरडा करेल. लोकशाहीमध्ये आंदोलन सुद्धा एक प्रकार आहे. लोकशाहीमध्ये पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष असतो. प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने पाहतो. जेनजीने आंदोलन करू नये असे मी बोलणार नाही. पण ते कसे करायला हवे याबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिले आहे. आंदोलन सिस्टिम करेक्शनसाठी होणं गरजेचं आहे. जे कधी व्हायला पाहिजे ते होत नाही तेव्हाच आंदोलनं होतात. जेनझी आपलीच पिढी आहे, आपलेपणा हवा. जेनझी जेन अल्फा आमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक आहेत. आमच्या पिढीत मोठ्यांचे ऐकत होतो. आताचे जेनझी आणि अल्फा प्रश्न विचारतात आणि त्यांना प्रेम पाहिजे. वेगवेगळी मतमतांतरे यातून येत असतात. मला डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हंटलं, तर मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असेही मोहन भागवत म्हणाले.
’15 लाख पैकी 1 लाख शाळांमध्ये टॉयलेट नाही, मग मुलगी शिकणार कशी? 15 हजार शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही ही राष्ट्रीय आणीबाणी आहे का?’ असा सवाल भागवत यांना करण्यात आला. त्यावरही भागवत म्हणाले, “शिक्षण हा कमर्शियल बिझनेस नाही. शिक्षण सर्वांना सुलभ असावे, असे स्ट्रक्चर करावे लागेल. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. ज्याची जबाबदारी आहे त्याने हे ठिक करावे. कार्यकर्ते आणि लोकांनी मिळून अनेक गावांमध्ये चांगल्या शाळ्या केल्या आहेत. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला सहभागी व्हावे लागेल. शिक्षकांनाही प्रशिक्षण द्यावे लागेल. पण बेसिक म्हणजे शिक्षण हे पुढची पिढी तयार करण्यासाठी देत आहोत, पैसे कमाविण्यासाठी नव्हे”
“आपल्याकडे 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण पद्धतीसाठी समिती तयार होते, पण काम होत नाही” याकडे भागवत यांचे लक्ष वेधण्यात आले. . त्यावर भागवत म्हणाले की, 6 टक्के निधीची मागणी आम्ही सुद्धा करतो. ही मागणी योग्य आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने पूर्ण शिक्षण व्यवस्था चालवण्याची गरज नाही. बजेटच्या भरवशावर शिक्षण व्यवस्था नाही चालत. स्पिरिट जागवण्याची गरज आहे. आंदोलनाशिवायही हे होऊ शकते
